Wednesday, August 20, 2025 10:16:48 AM

पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यामुळे अफगाणिस्तानमध्ये 15 मृत्यू; तालिबाने घेतली बदला घेण्याची शपथ

तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने या हवाई हल्ल्याचा निषेध करत बदला घेण्याची शपथ घेतली आहे. मंत्रालयाने म्हटले की, “आमच्या भूमीचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करणे हा आमचा कायदेशीर अधिकार आहे.”

पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यामुळे अफगाणिस्तानमध्ये 15 मृत्यू तालिबाने घेतली बदला घेण्याची शपथ

नवी दिल्ली : पाकिस्तानने 24 डिसेंबर 2024 रोजी रात्री अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतातील बर्मल जिल्ह्याला लक्ष्य करून हवाई हल्ले केले. या हल्ल्यात महिलांसह किमान 15 लोकांच्या मृत्यूची माहिती समोर आली आहे. खामा प्रेसच्या वृत्तानुसार, बचावकार्य चालू असल्यानं मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. हल्ल्याचा फटका लमण आणि इतर सात गावांना बसला, तर मुर्ग बाजार गावात मोठं नुकसान झाले आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील पाच सदस्यांना आपला जीव गमवावा लागला.

वृत्तानुसार, पाकिस्तानच्या फाईटरजेट्सद्वारे बॉम्बस्फोट करण्यात आले होते आणि याला जबाबदार पाकिस्तानच्या हवाई दलाला ठरवण्यात आले आहे. तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने या हवाई हल्ल्याचा निषेध करत बदला घेण्याची शपथ घेतली आहे. मंत्रालयाने म्हटले की, “आमच्या भूमीचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करणे हा आमचा कायदेशीर अधिकार आहे.”

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याच्या या घटनेने दोन्ही देशांमधील तणावात आणखी वाढ केली आहे. खासकरून, पाकिस्तानच्या हद्दीत अतिरेक्यांची उपस्थिती असलेल्या तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) च्या प्रकरणामुळे हे हल्ले होण्याची शक्यता अधिक वाढली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, या हल्ल्याच्या घटनेने आंतरराष्ट्रीय राजकारणात आणखी उलथापालथ घडली आहे.

अद्याप अधिकृतपणे मृतांची संख्या उघड करण्यात आलेली नाही, पण किमान 15 मृतदेह सापडले आहेत. या घटनेनंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये संघर्षाच्या नव्या वळणाची शक्यता दिसून येत आहे.


सम्बन्धित सामग्री