कोल्हापूर : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी पर्यावरण, प्रदूषण आणि ऊसतोड कामगारांच्या परिस्थितीवर महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. "महालक्ष्मीच्या आशीर्वादाशिवाय कोणत्याही कामाला सुरुवात करू शकत नाही. माझ्याकडे आलेलं खातं हे सृष्टीला वाचवण्यासाठी योगदान देणार आहे." मुंडे यांनी पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे अशी भावना व्यक्त केली. त्यांनी यापूर्वी महालक्ष्मीच्या आशीर्वादाने एक वेळेस पूराच्या संकटाला तोंड दिलं असल्याचंही यावेळी सांगितलं आणि पर्यावरण खात्याच्या माध्यमातून यासंबंधी नवनवीन उपाययोजना तयार करून अंमलात आणण्यासाठी अंबाबाईचे दर्शन घेतल्याचे सांगितले.
ऊसतोड कामगारांच्या हक्कासाठी संघर्ष
"ऊसतोड कामगारांची मुलं शाळेत जात नाहीत, त्या गावातच राहतात. त्यांच्यासाठी उत्तम व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे." शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची आवश्यकता आहे. पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांची शाळेत जात नसलेली स्थिती बदलण्याची गरज आहे असेही मत त्यांनी व्यक्त केले.
मुंबई आणि पुणे शहरांमध्ये प्रदूषण वाढल्याचे पंकजा मुंडे यांनी मान्य केले आणि या संदर्भात संबंधित कारखान्यांकडून होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी स्वतः लक्ष देण्याची ग्वाही दिली.
बीड प्रकरणावर मुंडेंची भूमिका
पंकजा मुंडे यांनी बीड प्रकरणातील क्रूरतेचा निषेध केला आणि त्यासाठी एसआयटीचा मागणी केली आहे. त्यांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली योग्य न्याय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला. "बारामती आणि पुण्यातील खून आणि मुळशी पॅटर्न अद्याप सुरू आहे. यामध्ये कोणतेही राजकारण न करता सामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका आम्हाला घ्यायची आहे." मुंडे म्हणाले की सध्या राज्यात कडक नियम आणि शासन झाले तर अशा घटनांचा परिहार होईल, असा विश्वास व्यक्त केला.