Wednesday, September 03, 2025 10:55:15 PM

पतंजलीचा 'मेगा फूड अँड हर्बल पार्क' नागपूरमध्ये सुरू होणार; अनेक तरुणांना मिळणार रोजगार

या प्लांटच्या स्थापनेपासून, पतंजलीने सुमारे 500 लोकांना रोजगार दिला आहे. कामाची व्याप्ती वाढल्यानंतर ही संख्या लवकरच 10 हजार पर्यंत पोहोचू शकते.

पतंजलीचा मेगा फूड अँड हर्बल पार्क नागपूरमध्ये सुरू होणार अनेक तरुणांना मिळणार रोजगार
Patanjali Mega Food and Herbal Park
Edited Image

Patanjali Mega Food and Herbal Park: नागपूर येथील मिहान परिसरात लवकरच 'पतंजली मेगा फूड अँड हर्बल पार्क'चे उद्घाटन होणार आहे. प्राप्त माहितीनुसार, 9 मार्च 2025 पासून या पार्कचे उद्धाटन होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ 2016 मध्ये झाला आणि तेव्हापासून या प्रकल्पावर काम सुरू आहे. या प्लांटच्या स्थापनेपासून, पतंजलीने सुमारे 500 लोकांना रोजगार दिला आहे. कामाची व्याप्ती वाढल्यानंतर ही संख्या लवकरच 10 हजार पर्यंत पोहोचू शकते.

पतंजली मेगा फूड अँड हर्बल पार्क नागपूरमध्ये का स्थापन करण्यात आला?

नागपूरला 'संत्र्याचे शहर' म्हणून ओळखले जाते. येथे संत्री, मोसंबी आणि लिंबू यांसारखी लिंबूवर्गीय फळे मुबलक प्रमाणात आढळतात. हे लक्षात घेऊन, पतंजलीने नागपूर्मध्ये लिंबूवर्गीय प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे, जिथे दररोज 800 टन फळांवर प्रक्रिया करून गोठवलेल्या रसाचे सांद्रण, लगदा, पेस्ट आणि प्युरी तयार केली जाईल. ही सर्व उत्पादने 100% नैसर्गिक असतील आणि त्यामध्ये साखर किंवा प्रिजर्वेटिव्स वापरले जाणार नाहीत. याशिवाय, या प्लांटमध्ये आवळा, आंबा, पेरू, पपई, सफरचंद आणि डाळिंब यांसारख्या उष्णकटिबंधीय फळांवर देखील प्रक्रिया करण्यात येणार आहे. 

हेही वाचा - 'ही' भारतीय महिला वयाच्या 27 व्या वर्षी बनली कंपनीची CEO; कोट्यवधींच्या संपत्तीसह ईशा अंबानीला टाकले मागे

प्रिझर्व्हेटिव्ह्ज किंवा साखरेशिवाय बनवण्यात येणार प्रोडक्ट -  

नागपूरमधील या प्लांटमध्ये एक टेट्रा पॅक युनिट देखील स्थापित केले जाईल, जे कोणत्याही प्रिझर्व्हेटिव्ह्ज किंवा साखरेशिवाय प्रीमियम सेगमेंटमध्ये पॅकिंग करेल. या प्रक्रियेला दुय्यम प्रक्रिया म्हणतात. या पतंजली प्लांटची आणखी एक खासियत म्हणजे येथे उत्पादित होणाऱ्या उप-उत्पादनांचा देखील पूर्णपणे वापर केला जातो. उदाहरणार्थ, संत्र्याच्या सालीचा वापर कोल्ड प्रेस ऑयल आणि प्रीमियम लगदा बनवण्यासाठी केला जातो.

हेही वाचा - वयाच्या 27 व्या वर्षी कमावली एलोन मस्क इतकी संपत्ती; कोण आहे 'ही' अद्भुत व्यक्ती? जाणून घ्या

शेती आणि अन्न प्रक्रिया उद्योगाला मिळणार चालना -  

याशिवाय, संत्र्याच्या सालीपासून सुगंधी द्रव्ये देखील तयार केली जातात, जी सौंदर्यप्रसाधने आणि इतर उत्पादनांमध्ये वापरली जातात. अशाप्रकारे, कोणतेही उप-उत्पादन वाया जात नाही. या प्लांटमुळे केवळ रोजगार निर्माण होणार नाही तर भारतीय शेती आणि अन्न प्रक्रिया उद्योगाला एक नवीन दिशा मिळण्यास मदत होणार आहे. 
 


सम्बन्धित सामग्री