Wednesday, August 20, 2025 08:18:00 AM

''मतदान न करणाऱ्यांच्या सुविधा बंद कराव्या" काँग्रेसच्या नेत्याची मोदींकडे मागणी

१००% मतदान अनिवार्य करायला पाहिजे, आणि जे लोक मतदानासाठी जात नाहीत, त्यांच्या सुविधांचा वापर सरकारने बंद करावा.

मतदान न करणाऱ्यांच्या सुविधा बंद कराव्याquot काँग्रेसच्या नेत्याची मोदींकडे मागणी 

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी झालेल्या निवडणुकींच्या हालचालींवर भाष्य करतांना "वन नेशन वन इलेक्शन"च्या मुद्द्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. पटोले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर भाषणात "वन नेशन वन इलेक्शन" लागू करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, परंतु त्यानंतर झालेल्या राज्य निवडणुकांमधून स्पष्ट झाले की, एकाच वेळी चार राज्यांच्या निवडणुका घेणं शक्य नाही. त्यांनी या मुद्द्यावर शंका उपस्थित करत म्हटले की, राज्यांच्या निवडणुका आणि देशातील मोठे प्रश्न, जसे की शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, शेतमालाच्या भावाचा अभाव, आणि भ्रष्टाचार यावर अधिक लक्ष दिले पाहिजे.

पटोले यांनी सांगितले की, सध्या केंद्र सरकार शेतकऱ्यांचे आणि सामान्य माणसांचे मुद्दे दुर्लक्षित करत आहे. जीएसटी कायद्यामुळे आणलेल्या महसुली समस्यांवरही त्यांनी भाष्य केले. त्यातच, लोकसभेत राहुल गांधी यांनी उपस्थित केलेले मुद्दे सरकार दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पटोले यांनी केला.

मतदानाविषयीही पटोले यांनी महत्वाचे विधान केले. "लोकांचा मतदानाचा टक्का वाढवायला केंद्र सरकारने कायदा करायला हवा. १००% मतदान अनिवार्य करायला पाहिजे, आणि जे लोक मतदानासाठी जात नाहीत, त्यांच्या सुविधांचा वापर सरकारने बंद करावा," असे पटोले यांनी सांगितले.

 

हे ही वाचा : भाजप युवा मोर्चाचं ईव्हीएम समर्थनार्थ आंदोलन
 


सम्बन्धित सामग्री