Wednesday, September 10, 2025 09:49:53 PM

Pitru Paksha 2025 : केवळ पिंडदानच नाही तर, श्राद्धात या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत; जाणून घ्या

केवळ पिंडदानच नाही तर, तर्पण, अन्न, दान, उपवास आणि मंत्रांचा जप देखील श्राद्धात किंवा पितृ पक्षात महत्त्वाचा आहे. हेही पूर्वजांच्या शांती आणि समाधानासाठी आवश्यक आहेत. याविषयी अधिक जाणूुन घेऊ..

pitru paksha 2025  केवळ पिंडदानच नाही तर श्राद्धात या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत जाणून घ्या

Pitru Paksha 2025 : हिंदू धर्मात, श्राद्ध पक्ष हा पूर्वजांच्या स्मृतीसाठी आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी एक अतिशय शुभ काळ मानला जातो. हा पंधरवडा भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत असतो. याला 'पितृपक्ष' म्हणतात. या काळात, तर्पण, पिंडदान आणि ब्राह्मणांना आदराने जेवण देऊन दिवंगत पूर्वजांना श्रद्धांजली वाहिली जाते. हे केवळ कृतज्ञता व्यक्त करण्याचे माध्यम नाही तर, पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा देखील आहे. श्राद्ध कर्म पूर्वजांच्या आत्म्याला समाधान देते आणि त्यांचे आशीर्वाद त्यांच्या वंशजांना सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्य प्रदान करतात.

श्राद्ध कर्म करताना, अनेक सूक्ष्म नियम आणि गोष्टींचे पालन करणे खूप महत्वाचे आहे. कारण, हे नियम श्राद्ध पूर्ण आणि फलदायी बनवतात. जसे की तर्पण करताना पाण्यात काळे तीळ घालणे, शुद्धता राखणे, अन्न शुद्ध आणि सात्विक असावे, दक्षिणा आणि ब्राह्मण सेवा आदी योग्य नियमांनुसार करावी. याशिवाय, भक्तीने आणि नियमितपणे मंत्रांचे पठण करणे, योग्य तिथीला श्राद्ध करणे आणि पूर्वजांच्या स्मरणार्थ दान करणे आदी. या सर्व गोष्टी एकत्रितपणे मिळून श्राद्धकर्म पूर्ण होते. म्हणून, केवळ विधीच नाही तर शुद्ध अंतःकरणाने आणि भक्तीने केलेले श्राद्ध पितरांना प्रसन्न करते.

हेही वाचा - Vastu Tips : घराच्या भिंतीवर किंवा छतावर वाढलेले पिंपळाचे झाड वास्तुदोष न लागता कसे काढाल?

तीळ आणि कुश: धार्मिक श्रद्धेनुसार, तीळ भगवान विष्णूच्या घामापासून आणि कुश त्यांच्या केसांपासून उत्पन्न झाले. म्हणून श्राद्ध कर्मात त्यांचा वापर खूप महत्त्वाचा आहे.

श्राद्धात काय करावे: सूर्योदयाच्या वेळी स्नान करावे आणि पिंपळाच्या झाडाला एक तांब्या पाणी अर्पण करा. श्रद्धापूर्वक दिवा पेटवून ओवाळा, प्रार्थना करा आणि नमस्कार करून पूर्वजांकडून तुमच्या चुकांसाठी क्षमा मागा.

हे टाळा: राजमा, मसूर, तूर, गाजर, भोपळा, गोल भोपळा, वांगी, हिंग, कांदा, लसूण, काळे मीठ, जिरे, जांभूळ, पिप्पली, कंठ, हरभरा इत्यादी निषिद्ध आहेत.

गया श्राद्धाचे फळ : हिंदू समाजाचा असा ठाम विश्वास आहे की, गयामध्ये श्राद्ध पिंडदान केल्याने सात पिढ्यांचे पूर्वज मुक्त होतात.

पूर्वजांची निवड : आपले पूर्वज श्राद्ध कर्माने तृप्त होतात. परंतु, त्यात पवित्रता आणि भक्ती असणे आवश्यक आहे.

तर्पणामध्ये लोखंडी, मातीची भांडी वापरू नये : तर्पणमध्ये लोखंडी, मातीची भांडी आणि केळीची पाने वापरू नका. सोने, चांदी, तांबे आणि कांस्य भांडी योग्य आहेत.

पिंड म्हणजे काय : मृताच्या आत्म्याला अर्पण करण्यासाठी जव किंवा तांदळाचे पीठ किंवा पांढरा भात मळून बनवलेल्या गोलाकार आकाराला पिंड म्हणतात.

ब्राह्मण जेवण : पितृपक्षात ब्राह्मण भोजन आवश्यक आहे. जर ब्राह्मणाला अन्न देऊ शकत नसाल तर गरजू ब्राह्मणाला अन्नपदार्थ अर्पण करा.

हेही वाचा - Pitru Paksha 2025 : या राज्यात स्वतःसाठी केलं जात पिंडदान; जाणून घ्या कोणत्या मंदिराजवळ होते ही विधी

जलांजलीमध्ये अंगठ्याचे महत्त्व : तर्पण कर्म करताना, पिंडावर फक्त अंगठ्याने जलांजली अर्पण केली जाते. असे म्हटले जाते की अंगठ्याद्वारे अर्पण केलेली जलांजली थेट पूर्वजांपर्यंत पोहोचते.

श्राद्ध कर्म म्हणते : श्राद्धादरम्यान पृथ्वीवर पसरलेले अन्न पिशाच्च योनीला तृप्त करते. पृथ्वीवर पाणी ओतल्याने, झाडांना पाणी घातल्याने वृक्ष योनी प्राप्त झालेले पूर्वज तृप्त होतात. देव योनी प्राप्त झालेले पूर्वज सुगंध आणि दिव्याने तृप्त होतात. मानव योनी प्राप्त झालेले पूर्वज अन्न, पाणी, तीळ आणि कपडे दान केल्याने तृप्त होतात. तुळशीच्या पानांनीही पिंडदान करण्याचाही नियम आहे. असे म्हटले जाते की, यामुळेही पूर्वज पूर्णपणे तृप्त होतात.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री