मुंबई: राज्याच्या राजकारणात अनेक नवनव्या घडामोडी घडत आहेत. नुकताच, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या 'एन्काउंटर विथ वृषाली कदम' ला मुलाखत दिली. यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी खळबळजनक वक्तव्य केले. हाके म्हणाले की, 'शासनाला जीआर काढायचा अधिकारच नाहीये'.
काय म्हणाले ओबीसी नेते लक्ष्मण हाके?
जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या संपादिका वृषाली कदम परब यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना सवाल केला. 'जीआर निघाला आहे, तुम्ही फार आक्रमक आहात. त्या जीआरबद्दल कुठल्या अशा बाबी आहे त्यावर तुमचा प्रामुख्याने आक्षेप आहे?'.
यावर, ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले की, 'खरंतर हा जीआर काढण्याचा मूळात शासनाला हा अधिकारच नाहीए. कारण हा अधिकार इंद्रसहानी जजमेंटमध्ये 1992-93 मध्ये हा जीआर त्या त्या स्टेट बॅकवर्ड कमिशनला आहे किंवा सेंट्रल बॅकवर्ड कमिशनला आहे, जो स्वायत्त आहे, जो संविधानिक आहे ज्याला कॉस जुडिशरी त्याचं स्वरूप आहे किंवा त्या आयोगाला संविधात्मक दर्जा आहे'.