Wednesday, September 10, 2025 08:02:29 PM

Sena MNS Yuti : 'मविआ'शी काडीमोड, मुंबई महापालिकेसाठी राज उद्धव एकत्र; दसरा मेळाव्यात युतीची घोषणा?

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नवनव्या घडामोडी घडत असतात. अशातच, एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दादर येथील 'शिवतीर्थ' या निवासस्थानी दाखल झाले.

sena mns yuti  मविआशी काडीमोड मुंबई महापालिकेसाठी राज उद्धव एकत्र दसरा मेळाव्यात युतीची घोषणा

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नवनव्या घडामोडी घडत असतात. अशातच, एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दादर येथील 'शिवतीर्थ' या निवासस्थानी दाखल झाले. तिथे त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या भेटीत युतीबाबतची चर्चा झाली. या चर्चेनंतर, आता दोन्ही आता दोन्ही भावांची राजकीय युती होण्याचे संकेत स्पष्ट होत आहेत. 

येत्या 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्यात या युतीबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे, 'शिवसेना ठाकरे गट आणि मनसे' या दोन पक्षांचे येणे हे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. विशष म्हणजे, या बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत त्यांचे निकटवर्तीय संजय राऊत आणि अनिल परब उपस्थित होते. तसेच, राज ठाकरेंसोबत बाळा नांदगावकर उपस्थित होते. 

ठाकरे बंधूंमध्ये झालेली आजची भेट ही फक्त दोन भावांमधील कौटुंबिक भेट नसून ती राजकीय बैठक असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कुटुंबातील कोणालाही न आणता थेट त्यांच्या राजकीय सहकाऱ्यांसह राज ठाकरेंची भेट घेतली. यामुळे, या बैठकीचा मुख्य उद्देश आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी रणनीती आखणे असा होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

महानगरपालिका निवडणुकीत जर ठाकरे गट आणि मनसे एकत्र आले, तर जागावाटप, महत्त्वाच्या वार्डांवरील उमेदवारी आणि निवडणुकीतील धोरणात्मक भूमिका यावर आजची चर्चा केंद्रित होती, असे मानले जात आहे. अनिल परब हे मुंबईतील प्रत्येक वॉर्डचे राजकीय गणित ओळखणारे नेते असल्यामुळे ते या चर्चेत सक्रिय भूमिका बजावतील, अशी माहिती आहे.


सम्बन्धित सामग्री