मुंबई: आगामी महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधू युती होणार असल्याची काही दिवसांपासून चर्चा आहे. अशातच गणपती दर्शनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे सहकुटुंब पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गेले होते. पुन्हा एकदा आज पुन्हा उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले आहेत. या भेटीवेळी मनसेचे प्रमुख नेतेही उपस्थित होते. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सततच्या भेटीमुळे युतीबाबत कार्यकर्त्यांमधील उत्सुकता वाढली आहे. ठाकरे बंधूंच्या या भेटीगाठी आगामी महापालिका निवडणुकीसाठी राजकीय सूतोवाच देतायेत का अशी चर्चा सुरू झाली आहे.