Tuesday, September 09, 2025 09:13:03 PM

Kolhapur Gokul Sabha : गोकुळ दूध महासंघाने घेतला महत्त्वाचा निर्णय; लवकरच होणार 'या' नवीन उत्पादनांची बाजारपेठेत एंट्री

कोल्हापुरात गोकूळ दूध महासंघाची चर्चा सुरू आहे. ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण महाडिक विरुद्ध मुश्रीफ आज आमने-सामने येणार आहेत.

kolhapur gokul sabha  गोकुळ दूध महासंघाने घेतला महत्त्वाचा निर्णय लवकरच होणार या नवीन उत्पादनांची बाजारपेठेत एंट्री

कोल्हापूर: कोल्हापुरात गोकूळ दूध महासंघाची चर्चा सुरू आहे. ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण महाडिक विरुद्ध मुश्रीफ आज आमने-सामने येणार आहेत. या बैठकीत नेमकं कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते, तसेच गोकूळ दूध संघासंदर्भात काही महत्त्वाचा निर्णय होतो का? याकडे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

काय म्हणाल्या शौमिका महाडिक?

'म्हणणं ऐकण्याचा किंवा न ऐकण्याचा प्रश्न नाहीए. इथे मी आपल्या तत्वांशी तडजोड करायला तयार नाहीए', अशी प्रतिक्रिया शौमिका महाडिक यांनी दिली आहे. 'बहीण हट्टी आहे, तिचे काही प्रश्न आहेत, तिच्या सभासदांचे काही प्रश्न आहेत, ते सोडवल्यावर भावाचं ऐकेल', असंही त्या म्हणाल्या. 'त्यांची उत्तरं ऐकायला आम्हीही इच्छुक आहोत. आम्ही खाली बसून ऐकू शकतो. व्यासपीठावर न जाण्याचा निर्णय मी आधीच घेतलेला आहे. ते माझ्या तत्वात बसत नाहीत आणि जे माझ्या तत्वात बसत नाहीत, ते मी कधीच करत नाही'.

गोकूळ दूध महासंघाने घेतला मोठा निर्णय

कोल्हापूरातील प्रसिद्ध गोकूळ दूध महासंघाने मदर डेअरी आणि अमूलसारख्या बड्या ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोकूळ दूध महासंघ चीज आणि आईस्क्रीमच्या बाजारपेठेत पाऊल ठेवणार आहे. यावर, संचालक मंडळाने बैठक घेतली होती. लवकरच, गोकूळ चीज आणि आईस्क्रीमच्या क्षेत्रात प्रवेश करणार आहे, असा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन उत्पादनांमुळे गोकूळ ब्रँडची बाजारपेठ वाढण्यास आणखी मदत होईल, अशी अपेक्षा आहे. 

गोकूळ दूध महासंघाने घेतलेल्या या निर्णयाने गोकूळ आणि इतर बड्या दूध उत्पादक ब्रँड्समध्ये स्पर्धा होणार आहे. तसेच, चांगल्या दर्जाच्या चीज आणि आईस्क्रीमसारख्या नवीन उत्पादनांच्या गुणवत्तेकडे आणि किंमतीकडे सर्वांचे लक्ष आहे.


सम्बन्धित सामग्री