Hindi Chatbots: डिजिटल विश्वातील वाढत्या स्पर्धेत मेटाने नवे पाऊल उचलले आहे. मार्क झुकरबर्गची कंपनी अमेरिकेतील कंत्राटदारांना 55 डॉलर (सुमारे 5,000 रुपये) ताशी या दराने नोकरी देत आहे. याटा उद्देश भारतासाठी सुपर-स्मार्ट हिंदी चॅटबॉट्स विकसित करणे हा आहे. तसेच व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि मेसेंजरला अधिक स्थानिक आणि वापरकर्त्यांशी जवळीक साधणारे बनवणे हे या प्रकल्पामागचे धोरण आहे. सध्या मेटा स्थानिक तज्ञांच्या मदतीने सांस्कृतिकदृष्ट्या सुरक्षित आणि वास्तववादी बॉट्स विकसित करण्यावर भर देत आहे.
कंपनीला सामान्य प्रोग्रामर नको आहेत, तर कथाकथन, पात्रनिर्मिती आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगमध्ये किमान सहा वर्षांचा अनुभव असलेले सर्जनशील तज्ज्ञ हवेत. हिंदीसह इंडोनेशियन, स्पॅनिश किंवा पोर्तुगीज भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. या चॅटबॉट्सद्वारे वापरकर्त्यांना चांगला अनुभव देण्याचे उद्दिष्ट आहे.
हेही वाचा - आज iPhone 17 होणार लॉंच, जाणून घ्या किती असणार किंमत ?
झुकरबर्गचे स्वप्न आहे की हे बॉट्स केवळ संवाद साधणारे नसून लोकांच्या दैनंदिन जीवनात सल्लागार आणि साथीदार बनतील. याआधी 2023 मध्ये मेटाने सेलिब्रिटींच्या एआय आवृत्त्या सादर केल्या होत्या, पण त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. 2024 मध्ये सुरू झालेल्या एआय स्टुडिओमुळे वापरकर्ते स्वतःचे बॉट्स तयार करू लागले, मात्र आता कंपनी व्यावसायिक नियंत्रण घेऊन गुणवत्ता सुनिश्चित करत आहे.
हेही वाचा - Russia-Ukraine War : युद्धामुळे युक्रेनियन मुले शाळेत जाऊ शकत नाहीयेत! शिकण्यासाठी अवलंबावा लागतोय हा मार्ग
भारत मेटाची सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने हिंदी बॉट्समुळे कंपनीच्या वाढीला गती मिळेल, असा अंदाज आहे. मात्र, आव्हानेही मोठी आहेत. आधीच मेटाच्या बॉट्सवर अल्पवयीनांशी चुकीचे संवाद, वैद्यकीय सल्ल्यात चुका आणि संवेदनशील कंटेंट तयार केल्याचे आरोप झाले आहेत. त्याचबरोबर, वापरकर्त्यांची माहिती व गोपनीयता धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.