Sunday, August 31, 2025 11:13:40 AM

पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान प्रदान

सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिड्स यांनी पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III ने प्रदान केला.

पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान प्रदान
PM Modi Received Cyprus Highest Honor,
Edited Image, X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रस सरकारने सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केले आहे. सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिड्स यांनी पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III ने प्रदान केला. ऑर्डर ऑफ मकारिओस III हा सायप्रसने दिला जाणारा नाईटहूड पुरस्कार आहे. हा सन्मान सायप्रसचे पहिले अध्यक्ष आर्चबिशप मकारिओस III यांच्या नावावर ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा - केदारनाथ हेलिकॉप्टर अपघात प्रकरणी आर्यन कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

140 कोटी भारतीयांसाठी सन्मान  - 

सायप्रसचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यानंतर, पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे की, राष्ट्रपती निकोस, ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III सन्मानाबद्दल मी तुमचे, सायप्रस सरकारचे आणि सायप्रसच्या जनतेचे मनापासून आभार मानतो. हा केवळ माझा सन्मान नाही तर 140 कोटी भारतीयांसाठी सन्मान आहे. हा प्रत्येक भारतीयाच्या आकांक्षा आणि क्षमतांसाठी सन्मान आहे. हा आपल्या संस्कृती, बंधुत्वाचा आणि वसुधैव कुटुंबकमच्या विचारसरणीचा सन्मान आहे. मी सर्व भारतीयांच्या वतीने मोठ्या नम्रतेने हा सन्मान स्वीकारतो. हा पुरस्कार शांती, सुरक्षा, प्रादेशिक अखंडता आणि आपल्या लोकांसाठी अटल वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

हेही वाचा - अहमदाबाद विमान अपघातातील 80 पीडितांचे DNA नमुने जुळले, 33 मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द

आतापर्यंत 20 हून अधिक देशांनी पंतप्रधान मोदींना सन्मानित केले आहे. मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी पंतप्रधान मोदींना 'द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन' देऊन सन्मानित केले. श्रीलंकेच्या सरकारने पंतप्रधान मोदींना 'श्रीलंका मित्र विभूषण सन्मान' देऊन सन्मानित केले. तथापि, कुवेतने पंतप्रधान मोदींना सर्वोच्च नागरी सन्मान 'द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर' देऊन सन्मानित केले आहे. 
 


सम्बन्धित सामग्री