Wednesday, August 20, 2025 09:15:31 AM

ठाकरे बंधू एकत्र येणार का? युतीबाबत बाळा नांदगावकरांचा मोठा खुलासा

राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेण्याचा आणि वाद टाळून निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा सल्ला दिला. युतीवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे बाळा नांदगावकर म्हणाले.

ठाकरे बंधू एकत्र येणार का युतीबाबत बाळा नांदगावकरांचा मोठा खुलासा

मुंबई: येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षबांधणीला गती दिली आहे. 4 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या पदाधिकारी मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला आता कुठलाही वाद किंवा गटबाजी नको, एकत्र या आणि निवडणुकीसाठी सज्ज व्हा. त्यांनी जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात सक्रिय करण्याचे आवाहन केले. 'कोण आवडतो, कोण पटत नाही यावर न जाता प्रत्येक माजी सहकाऱ्याला विश्वासात घ्या,' असा सल्ला त्यांनी दिला. युतीसंबंधी विचारल्यावर बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलं की मेळाव्यात पक्षांतर्गत कटकटीवर राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केलीये.'आम्ही एकत्र येतो तर, तुमची भांडणं का मिटत नाहीत? आधी आपापसातील मतभेद मिटवा' असा सज्जड दम राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला.


सम्बन्धित सामग्री