Raksha Bandhan 2025 : रक्षाबंधन हे बहीण-भावाच्या अतूट प्रेमाचे प्रतीक आहे. यंदा 9 ऑगस्टला हा बहीण-भावाच्या नात्याला गोडवा देणारा सण साजरा केला जाईल. पण या दिवशी काही चुका टाळल्या पाहिजेत. जेणेकरून, या सुंदर नात्यात दुरावा येऊ नये. असे मानले जाते की हा दिवस नातेसंबंध मजबूत करण्यासाठी आणि एकत्र वेळ घालवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
रक्षाबंधन हे भावा-बहिणीच्या अतूट प्रेमाचे, विश्वासाचे आणि आदराचे प्रतीक आहे. हा केवळ बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधण्याचा सण नाही तर, आयुष्यभर एकोप्याने राहण्याचे वचन आहे. या वर्षी रक्षाबंधन 9 ऑगस्टला (शनिवारी) साजरा केले जाईल. हा दिवस आनंदाने, हास्यकल्लोळाने आणि प्रेमाने भरलेला असावा. परंतु, मानवी स्वभाव आणि इतर बदलत्या काळामुळे यात अनवधानाने काही चुका होत आहेत. भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्यात दुरावा येऊ नये, म्हणून या चुका टाळल्या पाहिजेत. चला जाणून घेऊ, कोणत्या आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी..
रक्षाबंधनाचा पवित्र सण या कारणांनी कलुषित होतो
भेदभाव - अनेकदा पालक, वडीलधारे किंवा मुलेही मुलांमध्ये आणि एकमेकांमध्ये भेदभाव करतात. कोणत्या ना कोणत्या प्रकारे हा भेदभाव होताना अनेकदा लक्षात येतो. मग ते भेटवस्तू देण्याबाबत असो, प्रेम दाखवण्याच्या बाबतीत असो किंवा जबाबदाऱ्या वाटून घेण्याच्या बाबतीत असो. यामुळे सणाच्या दिवसाचा आनंद, उत्साह निघून जातो. अशा परिस्थितीत, रक्षाबंधनाच्या दिवशी असे अजिबात करू नका. सर्व भावंडांना समान वागणूक द्या.
हेही वाचा - Gajkesari Rajyog : जन्मकुंडलीत असा तयार होतो गजकेसरी राजयोग! जीवनात मिळतो खूप आदर आणि संपन्नता
भेटवस्तूंचा लोभ - रक्षाबंधनाच्या दिवशी भेटवस्तू देणे ही एक परंपरा आहे. आता रिटर्न गिफ्टची नवीन पद्धतही सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत, महागड्या गोष्टींची अपेक्षा करू नका. समाधानाची भावना ठेवा. प्रेम आणि भावनांना महत्त्व द्या. भेटवस्तूच्या किंमतीमुळे नात्याचे मूल्य कमी करू नका.
जुन्या अप्रिय गोष्टी उकरून काढणे - रक्षाबंधनाच्या दिवशी जुनी भांडणे, चुका किंवा तक्रारी लक्षात ठेवणे किंवा त्यावर बोलणे टाळा. हा दिवस नवीन सुरुवात आणि क्षमा करण्यासाठी आहे. जुन्या गोष्टी खोदून काढल्याने पुन्हा नात्यात दरी निर्माण होऊ शकते. या दिवशी सकारात्मक रहा आणि एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करा.
वेळ न देणे - धावपळीच्या जीवनात, अनेक वेळा आपण आपल्या नात्यांसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाही. रक्षाबंधनाच्या दिवशी हे करू नका. हा यांत्रिकपणे धार्मिक विधी करण्याचा दिवस नाही. तर, एकत्र वेळ घालवण्याचा दिवस आहे. तुमच्या भावाशी किंवा बहिणीशी बोला, आठवणींना उजाळा द्या आणि त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवा. एकत्र जेवण करा. हा सुंदर दिवसाचा आणि सुंदर नात्याचा आनंद घ्या.
नात्याला कमी महत्त्वाचे मानू नका - भाऊ आणि बहिणीचे नाते अमूल्य आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. ते कमी महत्त्वाचे मानू नका.
मत्सर, द्वेष, ईर्ष्या, तुलना - कधीकधी भाऊ आणि बहिणी नकळत एकमेकांचा हेवा करतात. शिक्षण, करिअर किंवा इतर कोणत्याही बाबतीत स्वतःला एकमेकांपेक्षा चांगले सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, असे करू नका. प्रत्येकाचे गुण-दोष वेगवेगळे आहेत आणि प्रत्येक व्यक्तीला महत्त्व आहे.
तामसिक अन्न - या दिवशी तामसिक अन्न खाणे (मांसाहार, मद्य, नशा चढणारे पदार्थ) टाळा. यामुळे तामसिक स्पंदने तयार होतात. यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो.
काळे कपडे घालू नका - या दिवशी भाऊ आणि बहिणींनी लाल, पिवळे किंवा इतर कोणत्याही रंगाचे कपडे घालावेत. परंतु, चुकूनही काळे कपडे घालू नयेत.
हेही वाचा - Vastu Tips : घरात अचानकपणे माकड येणं शुभ आहे की अशुभ?
(Disclaimer : ही बातमी सामान्य धार्मिक श्रद्धांवर आणि नैतिक मूल्यांवर आधारित आहे. जय महाराष्ट्र याद्वारे कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाने स्वतःच्या विवेकबुद्धीने विचार करावा.)