Sunday, September 07, 2025 07:04:24 PM

Study : पृथ्वीवरील सजीव सृष्टी सहाव्यांदा धोक्यात? यापूर्वी पाच वेळा नैसर्गिक कारणांमुळे.. पण आता..

पृथ्वीच्या इतिहासात, 5 वेळा जीव प्रजातींची सामूहिक विलुप्तता घडून आली आहे. अनेक शास्त्रज्ञ सहावी विलुप्तता घडून आल्यास ती मानवनिर्मित कारणांमुळे असेल असा इशारा देत आहेत. पण ती सुरू झाली आहे की नाही?

study  पृथ्वीवरील सजीव सृष्टी सहाव्यांदा धोक्यात यापूर्वी पाच वेळा नैसर्गिक कारणांमुळे पण आता

Sixth Mass Extinction Started or Not? : पृथ्वीच्या इतिहासात, 5 वेळा मास एक्स्टिंक्शन  (सामूहिक विलुप्तता) घडून आली आहे. यामध्ये कमीत कमी 75 टक्के प्रजाती अल्प भूगर्भीय कालावधीत नष्ट झाल्या आहेत. असे असले तरी पृथ्वीवरील जीवन टिकून राहिले आहे. आता पृथ्वीवर सहाव्या सामूहिक विलुप्ततेला सुरुवात झाली आहे, असे जगातील काही शीर्ष शास्त्रज्ञ आणि संस्था मानतात. शिवाय, याआधी घडलेल्या पाच सामूहिक विलुप्तता (सजीव सृष्टी नष्ट होण्याची प्रक्रिया) नैसर्गिक होत्या. परंतु, आताची ही सहावी मानवी क्रियाकलापांमुळे होत आहे. विविध प्रजातींचे कोट्यावधी जीव मरत आहेत. प्रजाती नामशेष होत आहेत. यासाठी मानव जबाबदार आहे, असेही शास्त्राज्ञांनी सांगितले आहे.

गेल्या 500 वर्षांत पृथ्वीवरील सुमारे 13 टक्के अपृष्ठवंशीय प्रजाती नामशेष झाल्या आहेत. शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की, जर ही प्रक्रिया अशीच सुरू राहिली, तर लवकरच जैवविविधतेत भयानक घट (Mother Earth Is In Danger) होईल. शास्त्रज्ञांचे हे विधान देखील सिद्ध झाले आहे. कारण ज्या 13 टक्के जीवांबद्दल बोलले जात आहे, ते आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाच्या (IUCN) धोक्यात असलेल्या प्रजातींच्या लाल यादीत देखील समाविष्ट आहेत. ज्या जीवांच्या प्रजाती धोक्यात आहेत त्यांचा या यादीत समावेश आहे.

हेही वाचा - Russia Attack On kyiv : रशियाचा झेलेंस्कीच्या मंत्र्यांवरच हल्ला, रहिवासी भागातच मिसाईल्स डागल्या

मात्र, काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, ही यादी एकतर्फी आहे. कारण त्यात कमी अपृष्ठवंशी प्रजातींचा समावेश आहे. बहुतेक सस्तन प्राणी आणि पक्ष्यांचा समावेश आहे. अपृष्ठवंशी जीवांना वाचवण्यासाठी या यादीत कोणत्याही तरतुदी नाहीत. संशोधकांचा असा विश्वास आहे की जर आपण अपृष्ठवंशीय प्रजातींची यादी पाहिली तर आपल्याला कळेल की, आपण पृथ्वीवरून मोठ्या प्रमाणात जीव गमावत आहोत. त्यांच्या प्रजाती वेगाने नामशेष होत आहेत. 2015 च्या एका अभ्यासात पृथ्वीवरून मोलस्क नामशेष होत आहेत, असे म्हटले होते.

पण असे असले तरी, सर्वच शास्त्रज्ञ पृथ्वीवरील सहाव्या मास एक्सिटिंशनला म्हणजेच, सामूहिक विलुप्ततेला सुरुवात झाली आहे, असे मानत नाहीत. मानव जागतिक जैवविविधता आणि परिसंस्थेचा ऱ्हास करत आहे. या परिणामांमुळे शेकडो वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत आणि आज अंदाजे 10 लाख प्रजाती नामशेष होण्याचा धोका आहे. परंतु, एका नवीन अभ्यासाच्या लेखकांनी सध्याच्या जैवविविधतेच्या संकटाला तोंड देण्यासाठी तातडीने उपाययोजना आखण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यांच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, अद्याप पृथ्वीवरील सहावे मास एक्स्टिंक्शन (सजीव सृष्टी सामूहिकपणे नष्ट होण्याची प्रक्रिया) सुरू झालेले नाही.

'अलीकडच्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, प्राण्यांच्या प्रजातींचे नष्ट होण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे आणि यामुळे मानवी अस्तित्व धोक्यात आले आहे', असे अमेरिकेतील अ‍ॅरिझोना विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र आणि उत्क्रांती जीवशास्त्राचे प्राध्यापक जॉन वियन्स यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - iPhone 17 Series Price: नव्या GST दरानंतर पुढील आठवड्यात लाँच होणाऱ्या आयफोन 17 ची किंमत किती असेल?

सुमारे 443 दशलक्ष वर्षांपूर्वी ऑर्डोविशियन काळाच्या शेवटी पहिल्या मास एक्स्टिंक्शमुळे पृथ्वीवरील सर्व प्रजातींपैकी 86 टक्के प्रजाती नष्ट झाल्या. त्यानंतर 375 दशलक्ष वर्षांपूर्वी 75 टक्के प्रजाती नाहीशा झाल्या.

दरम्यान, 4 सप्टेंबर रोजी PLOS बायोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या नामशेष होण्याच्या नवीन विश्लेषणामध्ये सहावे मास एक्स्टिंक्शन सुरू झाले नसल्याचे म्हटले आहे. संशोधकांचा असा अंदाज आहे की, अलीकडच्या शतकांमध्ये मानव-प्रेरित प्रजातींचे नष्ट होणे कमी झाले आहे.


सम्बन्धित सामग्री