Tuesday, September 02, 2025 01:44:45 AM

बिग बॉस फेम कशिष कपूरच्या घरात चोरी! लाखो रुपये घेऊन नोकर फरार

कशिष कपूरच्या घरी दरोडा पडला आहे. अभिनेत्रीच्या घरात काम करणाऱ्या नोकराने ही घटना घडवून लाखोंची रोकड घेऊन फरार झाला.

बिग बॉस फेम कशिष कपूरच्या घरात चोरी लाखो रुपये घेऊन नोकर फरार
Kashish Kapoor
Edited Image

मुंबई: बिग बॉस फेम आणि लोकप्रिय अभिनेत्री कशिष कपूरबद्दल मोठी बातमी येत आहे. कशिश कपूरच्या घरी चोरी झाली आहे. अभिनेत्रीच्या घरात काम करणारा नोकर लाखोंची रोकड घेऊन फरार झाला आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी फरार आरोपीचा शोध सुरू केला असून प्रकरणाचा तपास सुरू केला. 

अभिनेत्री कशिश कपूरच्या घरात चोरी

कशिश कपूरने अंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कशिशच्या घरात चोरी करणारा तिचा नोकर सचिन कुमार चौधरी 4.5 लाख रुपयांची रोकड घेऊन फरार झाला. सचिन गेल्या पाच महिन्यांपासून कशिशच्या घरी काम करत होता. 

हेही वाचा - 'या' चित्रपटाचा देशभरात डंका! 1500 कोटींच्या बजेटमधून 9 दिवसांत 3300 कोटी कमावले

कशिशने म्हटलं आहे की, 6 जुलै रोजी तिने तिच्या कपाटात सात लाख रुपये ठेवले होते, परंतु 9 जुलै रोजी तिला फक्त अडीच लाख रुपये सापडले. कशिशला तिच्या आईला पैसे पाठवायचे होते. परंतु, जेव्हा तिने घरात ठेवलेली रोकड तपासली, तेव्हा तिला मोठा धक्का बसला. अभिनेत्रीने ताबडतोब पोलिसांना याची माहिती दिली आणि तक्रार दाखल केली.

हेही वाचा - ज्येष्ठ तेलुगू अभिनेते आणि आंध्रचे माजी आमदार कोटा श्रीनिवास राव यांचे निधन

पोलिसांनी दाखल केला गुन्हा 

दरम्यान, कशिषच्या तक्रारीवरून अंबोली पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच, गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे. सचिन दररोज सकाळी 11:30 वाजता त्याच्या कामावर येते असे. तसेच तो दुपारी 1 वाजेपर्यंत त्याचे काम संपवून परत जात होता. 
 


सम्बन्धित सामग्री