धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर हल्ला झाल्याची घटना दोन दिवसांपासून चर्चेत होती. या घटनेसंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
मेसाई जवळगाच्या सरपंचाच्या गाडीवर हल्ला झाल्याची माहिती होती. पण आता त्या सरपंचाने हल्ल्याचा बनाव केल्याचे समोर येत आहे. सरपंचाने स्वत:च्या गाडीवर हल्ल्याचा बनाव रचल्याची घटना समोर आली आहे. बंदुक परवाना मिळवण्यासाठी सरपंचाने हा प्रकार केला आहे. नामदेव निकम असे सरपंचाचे नाव आहे.
हेही वाचा : रोहित पवारांच्या पोस्टनंतर राजकीय वादंग; काय आहे पोस्ट?
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील सरपंचाने त्याच्यावर हल्ला झाल्याचा बनाव रचला. बंदुक परवाना मिळवण्यासाठी सरपंचाने हा हल्ला घडवून आणला आहे. स्वत:च्याच गाडीवर हल्ला केल्यानंतर त्याने पोलिसात तक्रार केली. सरपंचाच्या जबाबावरून अज्ञात चार जणांविरूद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण केले असता घटनास्थळावरील परिस्थिती आणि सरपंचाने सांगितलेली माहिती यामध्ये विसंगती दिसून आली. बंदुकीचे लायसन्स मिळवण्यासाठी स्वत:च्या गाडीवर पेट्रोल टाकले आणि गाडीच्या काचा फोडल्या. पोलिसांना घटनेच्या तपासादरम्यान बंदुकीचे लायसन्स काढण्यासाठी सरपंचाने स्वत:वर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याचा बनाव केल्याचे माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली.