Friday, September 12, 2025 06:42:48 PM

Hong Kong Open 2025: सात्विक-चिराग हाँगकाँग ओपन उपांत्य फेरीत; क्वार्टर फायनलमध्ये केला मलेशियन जोडीचा पराभव

पुरुष दुहेरीच्या राउंड ऑफ 16 मध्ये सात्विक-चिरागचा सामना जुनैद आरिफ आणि रॉय किंग या मलेशियन जोडीशी झाला. तीन सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात भारतीय जोडीने 2-1 असा विजय मिळवला.

hong kong open 2025 सात्विक-चिराग हाँगकाँग ओपन उपांत्य फेरीत क्वार्टर फायनलमध्ये केला मलेशियन जोडीचा पराभव

Hong Kong Open 2025: भारताची आघाडीची पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी हाँगकाँग ओपन 2025 मध्ये उपांत्य फेरीसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. पुरुष दुहेरीच्या राउंड ऑफ 16 मध्ये सात्विक-चिरागचा सामना जुनैद आरिफ आणि रॉय किंग या मलेशियन जोडीशी झाला. तीन सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात भारतीय जोडीने 2-1 असा विजय मिळवला.

पहिल्या सेटमध्ये सात्विक-चिरागने 21-14 ने मात केली. दुसऱ्या सेटमध्ये मलेशियन जोडीने 22-20 ने पुनरागमन करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये सात्विक आणि चिरागने 21-16 ने विजय मिळवत उपांत्य फेरीसाठी आपले स्थान निश्चित केले. आता त्यांचा सामना चिनी तैपेईची जोडी चेन चेंग कुआन आणि लिन बिंग-वेई यांच्यासोबत होईल.

हेही वाचाBCCI President: बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत सचिन तेंडुलकर? दिग्गज क्रिकेटपटूकडून निवेदन जारी

पुरुष एकेरीत भारताचे लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी यांच्यातील उपांत्य फेरीत प्रवेशासाठी सामना ठरवणारा सामना राऊंड ऑफ 16 मध्ये पार पडला. लक्ष्य सेनने एचएस प्रणॉयवर 21-15, 18-21, 21-10 असा विजय मिळवत पुढील फेरीसाठी आपले स्थान निश्चित केले. आयुष शेट्टीनेही जपानी प्रतिस्पर्ध्याला 19-21, 21-12, 21-14 ने हरवले आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यामुळे भारताचे चाहते पुरुष एकेरीत कोण उपांत्य फेरीत पोहोचेल यावर उत्सुक आहेत.

हेही वाचा - Prithvi Shaw-Sapna Gill Case : छेडछाडप्रकरणी पृथ्वी शॉला न्यायालयाने फटकारले; उत्तर न दिल्याने ठोठावला 100 रुपयांचा दंड

सात्विक-चिरागची जोडी आणि पुरुष एकेरीतील भारतीय खेळाडूंचा जलद प्रर्दशन पाहता, हाँगकाँग ओपन 2025 मध्ये भारताच्या बॅडमिंटन संघाकडून आशादायक कामगिरीची अपेक्षा आहे. 


सम्बन्धित सामग्री