SBI FIXED DEPOSIT : भारतातील सर्वात मोठी बँक एसबीआयने अल्पकालीन फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदर कमी केले आहेत. आजपासून नवीन फिक्स्ड डिपॉझिट दर लागू झाले आहेत. 40 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदर 15 बेसिस पॉइंटने कमी करण्यात आले आहेत.
कोणत्या कालावधीच्या फिक्स्ड डिपॉझिटवर किती व्याज मिळेल हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
हेही वाचा - सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात होऊ शकते 'इतकी' वाढ
स्टेट बँक ऑफ इंडियाचा फिक्स्ड डिपॉझिटवरील नवा दर (State Bank of India latest fix deposit rate)
- स्टेट बँक ऑफ इंडियाने तीन शॉर्ट टर्म फिक्स्ड डिपॉझिटवरील (कमी कालावधीसाठी) व्याजदर 15 बेसिस पॉइंटने कमी केले आहेत.
- स्टेट बँक ऑफ इंडियाने सामान्य नागरिकांसाठी 40 दिवसांपासून ते 179 दिवसांच्या कालावधीसाठीचा व्याजदर 5.05% वरून 4.90% पर्यंत कमी केला आहे.
- स्टेट बँक ऑफ इंडियाने 180 दिवसांपासून 210 दिवसांच्या कालावधीसाठी फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदर 5.80% वरून 5.65% पर्यंत कमी केला आहे.
- तसेच, 211 दिवस ते 1 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी, बँकेने सामान्य नागरिकांसाठी व्याजदर 6.05% वरून 5.90% पर्यंत कमी केला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या मुदत ठेवींचा दर 15 बेसिस पॉइंटने कमी केला आहे. (State Bank of India senior citizen fixed deposit rate)
- स्टेट बँक ऑफ इंडियाने 46 दिवसांपासून ते 179 दिवसांपर्यंतच्या मुदत ठेवींचा व्याजदर 5.55% वरून कमी केला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आता हा दर 5.40% असेल.
- स्टेट बँक ऑफ इंडियाने 180 दिवस ते 210 दिवसांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर 6.30% वरून 6.15% पर्यंत कमी केला आहे.
- बँकेने 211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठीचा व्याजदर 6.55% वरून 6.40% पर्यंत कमी केला आहे.
हेही वाचा - EPFO कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 33.56 कोटी खात्यात जमा करण्यात आले 8.25 टक्के व्याज