Shravan Somvar Wishes 2025: आजचा सोमवार भगवान शिवभक्तांसाठी खूप खास आहे. आज म्हणजे 28 जुलै 2025 रोजी श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी उपवास केला जातो. शिवभक्त या दिवशी महादेवाची पूजा करतात आणि शिवलिंगावर जल अर्पण करतात. असे मानले जाते की असे केल्याने भोले बाबा त्यांच्या भक्तांवर लवकर प्रसन्न होतात. जर तुम्हालाही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना आणि सर्व शिवभक्तांना भगवान शंकराचे आशीर्वाद हवे असतील तर तुम्ही त्यांना श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारसाठी हे टॉप 10 शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारसाठी खास 10 शुभेच्छा
जो शिवावर प्रेम करतो,
त्याचे जीवन आनंदी राहते
श्रावण सोमवारच्या शुभेच्छा
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!
भगवान शिव आणि माता पार्वती तुमच्यावर कृपा करोत!
शंकराला प्रिय आहे बेलपत्र
श्रावणात भक्ती करतात भक्त
कृपा महादेवाची सर्वत्र
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा...!
हेही वाचा: Nag Panchami 2025: नागपंचमीची पूजा कशी करतात, चुकूनही 'या' गोष्टी करु नये
श्रावणाचा महिना महादेवासाठी खास
सर्वांना लागली शिवाच्या भक्तीची आस
चला महादेवाला नमन करूया...!
तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा !
श्रावण मासाला झाला प्रारंभ
करू शिवाच्या पूजेला आरंभ
ठेवू शिवाचे व्रत
होईल श्रावणी सोमवार सुफळ संपूर्ण
श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!
पहिल्या श्रावणी सोमवारच्या
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
भगवान शंकराची कृपा
आपणा सर्वांवर
अशीच राहो ही सदिच्छा!
ओम नमः शिवाय – बम बम भोले
श्रावणी सोमवारच्या
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
रंग रंगात रंगला श्रावण
नभ नभात उतरला श्रावण
पानापानात लपला श्रावण
फुलाफुलांत उमलला श्रावण
श्रावण महिन्याच्या मन भरून शुभेच्छा!
श्रावण सोमवारच्या निमित्ताने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत!
शिवशंभूच्या कृपेने जीवन सौभाग्यशाली बनो