साप चावल्यानं संतापला शेतकरी, थेट सापालाच खाल्लं; पाहणाऱ्यांचे उडाले होश
बांदा (उत्तर प्रदेश) : साप म्हटलं की अनेकांची भंबेरी उडते. साप चावला तर काही विचारूच नका. पण आता साप चावल्याने एका शेतकऱ्याला राग आला. त्या रागात त्या शेतकऱ्यांने त्या सापाला कच्च खाल्लं. या खळबळजनक घटनेची सद्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
नेमकं काय घडलं?
बांदा जिल्ह्यातील स्योहट गावात ५५ वर्षीय माताबदल यादव हे आपल्या खाटेवर झोपले होते. अचानक एका सापाने त्यांना चावा घेतला. इतर वेळी लोक घाबरून डॉक्टरांकडे धाव घेतात. पण यादव यांनी काही वेगळंच केलं. संतापाच्या भरात त्यांनी सापाला पकडले आणि त्याला चावून खाल्लं.
ही घटना पाहून यादव यांच्या कुटुंबीयांनी घाबरून त्यांना तात्काळ रुग्णालयात नेलं. सुरुवातीला त्यांना स्थानिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. मात्र परिस्थिती पाहता त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
ट्रॉमा सेंटरचे डॉक्टर विनीत सचान यांनी सांगितलं की, सापाचा विष केवळ रक्तात मिसळल्यास घातक ठरतो. सापाच्या विषाची ग्रंथी त्याच्या डोक्यात असते. त्यामुळं त्याला चावून खाल्ल्यानं विष शरीरात शोषलं जात नाही. पण, असं काहीही करण्याऐवजी त्वरित डॉक्टरांकडं जाणचं योग्य आहे.
हेही वाचा - Cockroach Milk: झुरळाचे दूध गाईच्या दुधापेक्षा 3 पट जास्त पौष्टिक! शास्त्रज्ञांनी केला आश्चर्यकारक खुलासा
गावठी उपचार करणाराही आश्चर्यचकित
यादव यांच्या कुटुंबीयांनी त्यांना सुरुवातीला गावठी झाडफूक करणाऱ्यांकडे घेऊन गेले. जेव्हा त्या गावठी औषण देणाऱ्याला कळलं की, यादव यांनी सापालाच खाल्लं आहे. तेव्हा त्यांनाही धक्का बसला. त्यांनी सांगितलं की, ‘साप चावल्यावर उपाय करतो, पण साप खाल्ल्यावर उपाय काय करायचा, ते आम्हालाही माहीत नाही.’
हेही वाचा - Flying Car Video: OMG!! हवेत उडणारी कार आली! रस्त्यावर धावणार आणि आकाशातही उडणार; काय आहे किंमत? जाणून घ्या
दरम्यान, साप चावल्यानंतर असे गावठी उपचार करणे जीवावर बेतू शकतं. यामुळं रुग्णालयात जाणं योग्य निर्णय असतो, असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.