महाराष्ट्र: खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भाषणावेळी संसदेत एकच गदारोळ पाहायला मिळाला. श्रीकांत शिंदे यांनी संसदेत खासदार राहुल गांधी आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. संविधानावरील चर्चेवर बोलताना श्रीकांत शिंदेंनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसने कायम बाबासाहेबांचा विरोध केला. संविधानाच्या नावाने यांनी फेक नरेटिव्ह चालवला.मतदारांनी काँग्रेसला 400 वरून 40 वर आणले, असा टोला श्रीकांत शिंदेंनी उपस्थित केला.
काय म्हणाले खा. श्रीकांत शिंदे?
सगळ्यांना घरी बसवलं. मतदारांनी काँग्रेसला 400 वरून 40 वर आणले, असा हल्लाबोल शिंदेंनी केला. राहुल गांधीजी तुमच्या आजी इंदिरा गांधी यांनी सावरकरांचे कौतुक करणारे पत्र लिहिले होते. त्यापण संविधान विरोधी होत्या का, असा सवाल श्रीकांत शिंदेंनी उपस्थित. सावरकरांचा अपमान ठाकरे गटाला मान्य आहे का? असा सवालही यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला केला.
आमच्या सरकारने OBC आयोगाला विशेष दर्जा दिला. आम्ही कलम ३७० हटवलं. यांनी धारावीचा मुद्दा मांडला. आम्ही धारावीचा पुनर्विकास करण्याची योजना सुरू केली. धारावीच्या लोकांना नवी आणि पक्की घर मिळणार आहेत. धारावीत दलीत, आदिवासी, मागासलेले लोक राहतात, मात्र त्यांना पक्की घरे देण्याला काँगेस आणि त्यांच्या मित्रपक्षांचा विरोध आहे, असा हल्लाबोल श्रीकांत शिंदेंनी केला.
त्याचबरोबर सावरकर प्रकरणावरूनही श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसला सवाल उपस्थित करत यांनी संविधानाचा कव्हर असलेलं पुस्तक वाटले पण आत कोरी पाने होती. संविधान कोणाच्या राज्यात धोक्यात होत ? असा थेट सवालही खासदार श्रीकांत शिंदेनी केला आहे.