Tuesday, September 02, 2025 03:07:26 AM

'आता तुझा मर्डर फिक्स्ड' सुहास कांदेंनी धमकावले

सुहास कांदे यांनी हत्येची धमकी दिली; असा गंभीर आरोप समीर भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी केला.

आता तुझा मर्डर फिक्स्ड सुहास कांदेंनी धमकावले

नांदगाव : नांदगावमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या गटात वाद झाला. वाद एवढा वाढला की सुहास कांदे यांनी हत्येची धमकी दिली; असा गंभीर आरोप समीर भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी केला. नांदगाव विधानसभा मतदारसंघातील राडा वाढत असल्याचे बघून पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी हस्तक्षेप करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. 

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्या विरोधात छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून कांदेंना उमेदवारी दिल्याने समीर भुजबळांनी बंड करण्याचा निर्णय घेतला. प्रचार सुरू झाला त्या दिवसापासूनच कांदे विरुद्ध समीर भुजबळ या राजकीय संघर्षाची तीव्रता झपाट्याने वाढू लागली. ऐन मतदानाची दिवशी या संघर्षाची तीव्रता आणखी वाढली आणि कांदेंनी हत्येची धमकी दिली; असा आरोप समीर भुजबळांच्या समर्थकांनी दिली आहे. 

सुहास कांदेंनी सकाळी काही मतदारांना बोलावले होते. या मतदारांना समीर भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांनी अडवले. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे समोरासमोर आले. नांदगाव - मनमाड मार्गावर गुरुकुल महाविद्यालयाजवळ ही घटना घडली. भुजबळांनी गाड्या आडव्या लावत मतदारांना अडवले. यामुळे तणाव वाढला. संतापलेल्या सुहास कांदेंनी गाडीतून उतरत धमकावण्यास सुरुवात केल्याचा आरोप समीर भुजबळांच्या समर्थकांनी केला. 


सम्बन्धित सामग्री