Monday, September 01, 2025 07:20:34 PM

Suresh Dhas: "आगे आगे देखो होता है क्या", धस यांचा सुचक इशारा

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वातावरण चांगलाच तापत असल्याचं पाहायला मिळतंय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सात आरोपींना मकोका लावण्यात आला असून वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आलेला नाही.

suresh dhas quotआगे आगे देखो होता है क्याquot धस यांचा सुचक इशारा

बीड: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वातावरण चांगलाच तापत असल्याचं पाहायला मिळतंय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सात आरोपींना मकोका लावण्यात आला असून वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आलेला नाही. याच संदर्भात सुरेश धस यांनी सूचक इशारा दिलाय. "आगे आगे देखो होता है क्या" असं म्हणत सुरेश धस यांनी सूचक इशारा दिलाय. त्याचबरोबर लवकरच आकाला मकोका लागणार त्याचबरोबर खुनाच्या गुन्ह्यात देखील येणार असं वक्तव्य आमदार सुरेश धस यांनी केलंय. मुख्यमंत्र्यांकडून केल्या जात असलेल्या कारवाईमुळे आम्ही समाधानकारक असल्याचही ते म्हणालेत. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

काय आहे मकोका कायदा?

महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गेनाइज्ड क्राइम अ‍ॅक्ट म्हणजेच मकोका कायदा संघटीत गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी 1999 मध्ये आणला. त्यापूर्वी असलेल्या टाडा कायद्याच्या धर्तीवर मकोका हा कायदा आणला गेला. हप्ता वसुली, खंडणी वसुली, अपहरण, हत्या, सामुहिक गुन्हेगारी या विरोधात मकोका लावला जातो. 

दरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सात आरोपींवर मकोका लावण्यात आला असून वाल्मिक कराडवर मकोका कायदा लावण्यात आला नाही. यामुळे आता सर्वत्र जोरदार चर्चा सुरु असून नेमकं आता हे प्रकरण काय वळण घेत हे पाहणं महत्वाचं ठरणारे. त्यातच अजून सुरेश धस यांनी  "आगे आगे देखो होता है क्या" असा इशारा दिल्याने सर्वत्र जोरदार चर्चा सुरूय.


सम्बन्धित सामग्री