Sunday, August 31, 2025 08:40:08 AM

भाजपच्या 'या' आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

शपथविधी सोहळ्यात भाजपा चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वप्रथम शपथ घेतली. राधकृष्ण विखे पाटील यांनी देखील कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

भाजपच्या या आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

महाराष्ट्र : नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय. मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली. त्यानंतर आता मंत्र्यांचा नागपूर येथे शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यात भाजपा चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वप्रथम शपथ घेतली. राधकृष्ण विखे पाटील यांनी देखील कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन त्याचबरोबर गणेश नाईक यांनी शपथ घेतली. विशेष म्हणजे मंगलप्रभात लोढा यांना कॅबिनेटमंत्रिद मिळाले असून त्यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली. 

यानंतर जयकुमार रावल यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर पंकजा मुडेंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बीडच्या आष्टी तालुक्यातील कारखेल खुर्द येथे मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळयासमोर हा जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. यानंतर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल सावे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर अशोक उईके आणि आशिष शेलार यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळला. 

यानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले, माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यानंतर संजय सावकरेंनी शपथ घेतली. यानंतर नितेश राणे, आकाश फुंडकर यांनी शपथ घेतली आकाश फुंडकर हे तीन वेळा भाजपचे आमदार राहिलेत. यानंतर माधुरी मिसाळ आणि आशिष जयस्वाल, मेघना बोर्डीकर, बाबासाहेब पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.  

भाजपच्या 'या' आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

चंद्रशेखर बावनकुळे 
राधकृष्ण विखे पाटील
चंद्रकांत पाटील 
गणेश नाईक 
मंगलप्रभात लोढा
जयकुमार रावल
गिरीश महाजन 
पंकजा मुंडे 
अतुल सावे
अशोक उईके
आशिष शेलार 
जयकुमार गोरे
संजय सावकरे
नितेश राणे
आकाश फुंडकर
माधुरी मिसाळ
आशिष जयस्वाल
मेघना बोर्डीकर 
बाबासाहेब पाटील

 


सम्बन्धित सामग्री