Wednesday, August 20, 2025 10:28:20 PM

शपथविधी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग?

कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये किंवा कोणाचीही गैरसोय होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

शपथविधी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल कोणते आहेत पर्यायी मार्ग

मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर आज दिनांक ५ डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा सोहळा पार पडेल. या शपथविधी सोहळ्याची आझाद मैदानावर जोरदार तयारी सुरु आहे. या शपथविधीसाठी मोठ्या प्रमाणात पोलिसबंदोबस्त तैनात करण्यात आला असून यासाठी अनेक नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती असणार आहे. यासाठी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये किंवा कोणाचीही गैरसोय होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. 

काय आहे बदल? 

महापालिका मार्ग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वासुदेव बळवंत फडके चौकदरम्यान वाहतूक बंद असणार आहे. क. हजारीमल सोमानी मार्ग: चाफेकर बंधू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वाहतूक प्रतिबंधित करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे, प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज ते कोस्टल रोड दरम्यानची दोन्ही बाजूंची वाहतूक बंद राहणार आहे. दुपारी १२ वाजल्यापासून ते कार्यक्रम संपेपर्यंत वाहतुकीचे नियमन लागू राहणार आहे.

कोण राहणार उपस्थित? 

या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. 

या शपथविधी दरम्यान काही ठिकाणची वाहतूक बंद असल्याने नागरिकांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज दिनांक ५ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपासून तर शपथविधी कार्यक्रम संपेपर्यंत हा नियम लागू असणार आहे. 


सम्बन्धित सामग्री