Luxury yacht sinks off Miami Beach: कॅमेऱ्याचा मोबाईल फोन हातात आल्यापासून सर्व लोक फोटो काढण्याचा आनंद घेत आहेत. अनेक महत्त्वाचे क्षण या कॅमेऱ्यात टिपले जातात. सेल्फीने तर यात मोठी 'क्रांती'च आणली. पण काही वेळा लोक गंभीर स्थितीतही सेल्फी घेत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. काही लोकांनी सेल्फीपायी जीवही गमावले आहेत. अशाच एका गंभीर प्रसंगात बोट बुडत असताना यातील तरुणी सेल्पी घेत मजा करत असल्याचे समोर आले आहे.
अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील मियामी बीचजवळच्या (Miami Beach) समुद्रात 32 लोक एका आकर्षक लॅम्बोर्गिनी टेकनोमार बोटीतून फिरायला गेले होते. त्यांना वाटत होते की, ही सहल खूप छान असेल. पण जेव्हा त्याची आलिशान बोट पाण्यात बुडू लागली, तेव्हा त्यांचा मोठा हिरमोड झाला.
मात्र, यानंतरही या बोटीतील तरुणी बुडत्या बोटीसोबत सेल्फी काढत होत्या. बुडत्या बोटीचे व्हिडिओ करत होत्या आणि फोटोही काढत होत्या. हसत विनोद करत होत्या.
हेही वाचा - बैलानं धूम स्टाईलमध्ये चालवली स्कूटर; पहिल्याच 'टेस्ट ड्राईव्ह'चा व्हिडिओ व्हायरल
प्रवाशांनी भरलेली आणि भरसमुद्रात अडकलेली ही लॅम्बोर्गिनी टेकनोमार बोट 63 फूट लांबीची होती. या बोटीची किंमत 4 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 33 कोटी भारतीय रुपये) आहे. या बोटीचे वजन 24 टन होते आणि ती 63 नॉट्स किंवा सुमारे 72 मैल प्रति तास वेगाने जाऊ शकत होती.
एक वेळ अशी आली की, बोट पूर्णपणे थांबली. यानंतर बोटीचा मागचा भाग पाण्यात बुडाला आणि पुढचा भाग अद्याप पाण्याबाहेर होता. यूएस कोस्ट गार्डने या सर्व 32 लोकांना सुरक्षितपणे वाचवले. कोणालाही दुखापत झाली नाही.
मात्र , या सर्व प्रकारादरम्यान, अनेकांनी बोटीत अडकलेल्या प्रवाशांवर टीका केली जात आहे. कारण ते लोक अशा वेळीही विनोद करत होते आणि निश्चिंत दिसत होते. याबद्दल एका वापरकर्त्याने लिहिले, ' तुम्ही लोक काय करत आहात?'
दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले, 'कोणतीही जलपरी मागे राहिली नाही.' त्याच वेळी, एका वापरकर्त्याने लिहिले की, 'मला जाणून घ्यायचे आहे की, मालक याबद्दल काय विचार करतो.' एका वापरकर्त्याने म्हटले,
न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, एका व्हिडिओमध्ये, माजी मिस अमेरिका स्पर्धक रेगन हार्टली बोटीवर तिच्या मांडीवर महागडी वाइन धरताना दिसत होती. बिकिनी घातलेल्या अनेक तरुणी त्यांच्या बुडत्या बोटीचे फोटो किंवा व्हिडिओ काढत होत्या. तसेच, बुडत्या बोटीसोबत सेल्फीही काढत होत्या.
अमेरिकन तटरक्षक दलाने सोशल मीडियावर एक पोस्ट पोस्ट केली. मोन्युमेंट आयलंडजवळ ही नाव पाण्यात शिरल्याची माहिती मिळाली. अशा परिस्थितीत, अधिकारी पोहोचले आणि त्यांनी सर्व 32 लोकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले.
ही उच्च दर्जाची बोट लॅम्बोर्गिनीच्या सुपर स्पोर्ट्स कार्सपासून प्रेरित आहे. लॅम्बोर्गिनी मियामी वेबसाइटवर असे म्हटले आहे की त्यात 16 लोक बसू शकतात. पण जेव्हा बोट बुडत होती. त्यावेळी जहाजावर क्षमतेपेक्षा दुप्पट लोक होते, म्हणजे 32 लोक.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिलांना मियामी बीच मरीना येथे नेण्यात आले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बोटीच्या मालकाची ओळख पटलेली नाही. बोट का बुडाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. फ्लोरिडा मासे आणि वन्यजीव संरक्षण आयोग या घटनेची चौकशी करत आहे.
हेही वाचा - जगातील सर्वांत महागडं विमानतळ, इथे एका केळाची किंमत आहे 500 रुपये! गगनाला भिडलेत दर