Sunday, August 31, 2025 08:07:39 AM

Vastu Tips : घरात अचानकपणे माकड येणं शुभ आहे की अशुभ?

ज्योतिषशास्त्रात घरात माकडे येण्याचे अनेक अर्थ सांगितले आहेत. माकड एकटे आले किंवा जोडीने, समूहाने आले तर, त्याचा काय अर्थ होतो? चला जाणून घेऊ..

vastu tips  घरात अचानकपणे माकड येणं शुभ आहे की अशुभ

Monkey Inside House : जंगलांची संख्या कमी झाल्यामुळे गावांमध्ये आणि शहरांमध्येही माकडे येणाचे प्रमाण वाढले आहे. काही लोक गंमत म्हणून किंवा दया म्हणून या माकडांना खायलाही देतात. तर, कधी-कधी माकडे स्वतःच घरात प्रवेश करून मिळेल त्या खाद्यपदार्थांवर ताव मारतात. घरात आलेली माकडे हाकलताना दमछाकही होऊ शकते आणि घरातील वस्तूंचे नुकसानही होते. पण, अशा पद्धतीने घरात अचानकपणे माकड येणं शुभ आहे की अशुभ हे तुम्हाला माहीत आहे का?

ज्योतिषशास्त्रात प्राण्यांशी संबंधित अनेक चिन्हे सांगितली आहेत जी शुभ आणि अशुभ दोन्ही स्वरूपात दिसू शकतात. त्याचप्रमाणे, जर एखादा प्राणी अचानक घराबाहेर दिसला किंवा अचानक घरात आला तर त्याच्याशी संबंधित अनेक संकेत असू शकतात. तर, चला, जाणून घेऊया की अचानक घरात माकड आले तर त्याचा अर्थ काय होतो.

घरात माकड आले तर काय होते?
घरात माकडाचे आगमन हे अनेक प्रकारच्या चिन्हांचे सूचक मानले जाते. जर घरात एखादे माकड येऊन काही अन्नपदार्थ उचलून नेले, तर याचा अर्थ असा की, तुमच्या घरात कधीही पैशाची आणि धान्याची कमतरता भासणार नाही.

माकडांचा गोंधळ
जर माकडांचा समूह गोंधळ घालत असेल, माकडांचा ओरडण्याचा किंवा भांडण्याचा आवाज येत असेल, तर हे तुमच्या कुटुंबात लवकरच भयंकर दुरावा निर्माण होणार आहे याचे लक्षण आहे.

माकडांची जोडी
जर घरात दोन माकडं जोडीने दिसली, म्हणजे एक नर माकड आणि एक मादी माकड, तर याचा अर्थ असा की, तुमच्या वैवाहिक जीवनातील त्रास संपणार आहेत. तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल.

हेही वाचा - Gajkesari Rajyog : जन्मकुंडलीत असा तयार होतो गजकेसरी राजयोग! जीवनात मिळतो खूप आदर आणि संपन्नता

कुटुंबावर संकट
जर एखादे माकड तुमच्या घरात येऊन शौचास गेले तर याचा अर्थ असा की तुमच्या घरावर आणि कुटुंबावर काही संकट येणार आहे. याचा अर्थ असाही होऊ शकतो की तुमच्या घरातील एखाद्याला काही आजार होऊ शकतो.

माकडांचा कळप
जर माकडांचा कळप घरात घुसला तर त्याच्या मागे दोन चिन्हे लपलेली आहेत. जर कळप शांत बसला असेल तर, याचा अर्थ असा की तुमच्या घरातील कौटुंबिक कलह संपणार आहे आणि नातेसंबंध खूप गोड होणार आहेत. जर माकडांचा कळप गोंधळ घालत असेल, माकडांच्या ओरडा-आरडा करण्याचा आवाज किंवा भांडणाचा आवाज ऐकू येत असेल, तर हे लक्षण आहे की लवकरच तुमच्या कुटुंबात दुरावा निर्माण होणार आहे.

हेही वाचा - या 5 राशींचे लोक असतात खूपच रोमँटिक; यांच्यावर राशीस्वामीचा असा असतो प्रभाव

तुमच्या घरी कधी अचानक माकड आले असेल, तर या लेखात दिलेल्या माहितीद्वारे तुम्ही घरात माकड येण्यामागे कोणते संकेत लपलेले आहेत हे देखील जाणून घेऊ शकता.

(Disclaimer : ही बातमी धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. जय महाराष्ट्र याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री