Wednesday, August 20, 2025 01:09:26 PM

लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला; घाटात पलटली बस

सद्या अपघातांच्या घटना दिवसानुदिवस वाढत आहे. त्यातच आता रायगड मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रायगडच्या ताम्हीणी घाटात बसचा भीषण अपघात झालाय.

लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला घाटात पलटली बस

रायगड : सद्या अपघातांच्या घटना दिवसानुदिवस वाढत आहे. त्यातच आता रायगड मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रायगडच्या ताम्हीणी घाटात बसचा भीषण अपघात झालाय. या अपघात इतका भीषण होता कि यात पाच जणांनाच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी आहेत. तर सत्तावीस जण किरकोळ जखमी आहेत. माणगाव- पुणे मार्गावरील ताम्हीणी घाटात ही  दुर्घटना घडलीय. प्रवाशांनी भरलेली बस रस्त्यालगत कलंडली आणि होत्याच नव्हतं झालं. 

कसा झाला अपघात? 

रायगडच्या ताम्हिणी घाटात एका खासगी बसचा अपघात झाला. या अपघातात बसमधील काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळते. पुण्यावरून रायगडच्या दिशेकडे येत असताना ताम्हिणी घाटातील तीव्र वळणावर ही बस कलंडली आणि अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एकूण 45 प्रवासी बसमधून प्रवास करत होते. त्यामधील बरेचसे प्रवासी जखमी असल्याची माहिती मिळतेय. काही प्रवासी बसखाली अडकून पडल्यानं त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.         

दरम्यान ही  बस लग्नाचं वऱ्हाड घेऊन जात असतानाच हा भीषण अपघात झालाय. ताम्हीणी घाटात बसचा हा भीषण अपघात झाला असून लग्नाच्या वऱ्हाडावर  काळाने घाला घातलाय. या अपघातात 5 मृत्यू, 27 जखमी तर 3 गंभीर जखमी झालेत. माणगाव- पुणे मार्गावरील ताम्हीणी घाटात ही दुर्घटना घडली असून प्रवाशांनी भरलेली बस रस्त्यालगतच  कलंडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून परिसरात शोककळा व्यक्त केली जातेय. 


सम्बन्धित सामग्री