Thursday, August 21, 2025 12:03:38 AM

काय आहे डोंगऱ्या देवाचा उत्सव?

नाशिकात डोंगऱ्या देवाचा मोठा उत्सव साजरा केला जातो. आदिवासी बांधवांचे दैवत म्हणजे डोंगऱ्या देव याचपार्शवभूमीवर आदिवासी जमातीत डोंगऱ्या देवाचा उत्सव साजरा केला जातो.

काय आहे डोंगऱ्या देवाचा उत्सव

नाशिक: नाशिकात डोंगऱ्या देवाचा मोठा उत्सव साजरा केला जातो. आदिवासी बांधवांचे दैवत म्हणजे डोंगऱ्या देव याचपार्शवभूमीवर आदिवासी जमातीत डोंगऱ्या देवाचा उत्सव साजरा केला जातो.जिल्ह्याच्या कळवण तालुक्यात आदिवासी जमातीत डोंगऱ्या देवाचा पंधरवडा उत्साहच्या स्वरूपात साजरा केला जातो. उत्सवाचे पंधरा दिवस डोंगर देवाचा उपवास धरून केवळ भूईमुग शेंगा, गूळ व लाह्यांचा आहार घेतला जातो. उडीद दाळ व मेथीची भाजी खाऊन एकत्रित रित्या उपवास सोडला जातो. झेंडूच्या झाडाची पुजा दैवत समजून केली जाते. उबराच्या झाडाचे तोरण असलेले मांडव घातले जातात. सांगता समारंभाच्या दिवशी डोंगर देवाचा दिवा लावून नृत्य गायन करत जागरण केले जाते. 

या कार्यक्रमासाठी आजूबाजूच्या गावातील लोकांना निमंत्रीतही केले जाते. दिवळीनंतर मार्गशीर्ष महिन्यात आदिवासी बांधवांचे दैवत म्हणजे डोंगऱ्या देवाचा मोठा उत्सव साजरा केला जातो. या जीवसृष्टीतील चिडी-मुंगी, पशू-पक्षी व मानवाचे कल्याण व्हावे अशी विनवणी करून प्रार्थना केली जाते.  पहाटेला सर्व डोंगऱ्या देवाला जाऊन कडाकपारीला नारळाने ठोकून देवाला दर्शन देण्यासाठी साकडं घालीत असतात. 

त्यानंतर सर्व माऊल्या घरी येतात. त्यांच्या स्वागतासाठी गावातील जेष्ठ मंडळींसह महिला, आबालवृद्ध वाट पहात असतात. माऊल्या घरी आल्यावर देवाला कोंबडा- बोकडाचा मान दिला जातो. संध्याकाळी भंडारा केला जातो व उत्सवाची सांगता होते.


सम्बन्धित सामग्री