Sunday, August 31, 2025 09:23:19 AM

कुंभमेळ्याआधी गोदावरी मोकळा श्वास घेणार?

कुंभमेळ्याआधी गोदावरी मोकळा श्वास घेणार का आणि भाविकांना गोदावरीत चांगले पाणी मिळणार का असा सवाल नाशिककरांनी गोदावरीतील प्रदूषणावर उपस्थित केलाय.

कुंभमेळ्याआधी गोदावरी मोकळा श्वास घेणार

नाशिक: कुंभमेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण काशी असलेल्या नाशिक शहरातही तयारी सुरू आहे. प्रयागराजला जावू न शकणारे भाविक गोदावरी नदीत स्नान करतील, पण ही दक्षिण काशीमधील गोदावरी पवित्र स्नानासाठी स्वच्छ आहे का? हा प्रश्न नाशिकरांसह महाराष्ट्रातील अनेकांना पडला आहे. गोदावरी स्वच्छ करण्यासाठी गेली अनेक वर्षे विविध मार्गांनी उपक्रम राबवले गेलेत. मात्र नाशिककरांच्या आस्थेचा भाग असलेला हा 'गोदाकाठ' दिवसेंदिवस प्रदुषित होत आहे. 

गोदावरी नदीचा उगम पश्चिम घाटातील सहयाद्रीच्या पर्वत रांगेतील ब्रह्मगिरी येथे झाला. पौराणिक कथेनुसार गौतम ऋषींनी गोहत्येचे प्रायश्चित म्हणून भगवान शंकराची तपश्चर्या केली. शंकरांनी प्रसन्न होऊन ब्रह्मगिरी पर्वतावर जटा आपटल्या आणि गोदावरी पृथ्वीवर अवतरली. असं मानलं जातं, अशा या नदीचा श्वास गेली अनेक वर्षे कोंडला गेलाय. 

गोदावरी प्रदूषणाच्या विळख्यात: 

1.नाशिक हे महाराष्ट्रातील तीर्थस्थानांपैकी महत्वाचे तीर्थस्थान. 
2.नाशिक आणि गोदावरी काठ हा दक्षिण काशी म्हणून ओळखला जातो. 
3.गंगा नदीच्या आधी गोदावरी नदीचा जन्म मानला जातो. 
4.गंगा नदीनंतर सर्वांत लांब नदी गोदावरी नदी आहे. 
5.गोदावरी नदीच्या काठावर नाशिकमध्ये कुंभमेळा भरतो. 
6.यावर्षी सिंहस्थ कुंभमेळा प्रयागराज येथे होतोय. 
7.त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये 2027 ला होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तयारीची मागणी. 
8.नाशिक महापालिकेने गोदावरी स्वच्छ आणि प्रदुषणमुक्त करण्यासाठी पावले उचलली. 
9.मात्र, गोदावरी प्रदुषणमुक्त होण्यासाठी व्यापक मोहिमेची गरज. 
10.महानगरपालिके कडून तब्बल 6 हजार 900 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 
11. याआधीही गोदावरीसाठी अनेक उपक्रम हाती घेतले, मात्र ते अनेकदा कागदोपत्रीच राहिले आहेत. 


सम्बन्धित सामग्री