Sunday, September 07, 2025 01:13:55 PM

Chandra Grahan 2025: आज चंद्रग्रहण किती वाजता सुरू होईल? भारतातून ब्लड मून दिसेल का? जाणून घ्या

चंद्रग्रहणाचे विविध प्रकार आहेत आणि आज होणारे ग्रहण हे पूर्ण चंद्रग्रहण आहे. पूर्ण चंद्रग्रहणाला ब्लड मून असे म्हणतात. कारण या वेळी चंद्र पूर्णपणे अंधारात झाकला जातो.

chandra grahan 2025 आज चंद्रग्रहण किती वाजता सुरू होईल भारतातून ब्लड मून दिसेल का जाणून घ्या

Chandra Grahan 2025: चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे, जी पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा घडते. पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे चंद्रग्रहण होते. चंद्रग्रहणाचे विविध प्रकार आहेत आणि आज होणारे ग्रहण हे पूर्ण चंद्रग्रहण आहे. पूर्ण चंद्रग्रहणाला ब्लड मून असे म्हणतात. कारण या वेळी चंद्र पूर्णपणे अंधारात झाकला जातो. या घटनेला धार्मिक महत्त्वही आहे. श्रद्धेनुसार, ग्रहणापूर्वी सुतक काळ सुरू होतो, मात्र तो फक्त ग्रहण दिसत असेल तरच लागू होतो.

चंद्रग्रहण किती वाजता होईल?

भारतीय वेळेनुसार, चंद्रग्रहण रात्री 8:58 वाजता सुरू होईल. या वेळी, पृथ्वीची सावली चंद्राच्या फक्त एका भागावर पडेल. यानंतर, आंशिक चंद्रग्रहण रात्री 9:57 वाजता दिसेल. तसेच पूर्ण चंद्रग्रहण सकाळी 11 वाजता सुरू होईल आणि चंद्र पृथ्वीच्या सावलीने पूर्णपणे झाकला जाईल. चंद्रग्रहण रात्री 11:41 वाजता त्याच्या शिखरावर असेल. यावेळी चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या मध्यभागी असेल. 

पूर्ण चंद्रग्रहण रात्री 12:22 वाजता म्हणजेच मध्यरात्री संपेल. चंद्र पृथ्वीच्या सावलीतून बाहेर पडण्यास सुरुवात करेल. तथापी, आंशिक चंद्रग्रहण पहाटे 1:26 वाजता संपेल. तसेच उपछाया ग्रहण देखील पहाटे 2:25 वाजता संपेल आणि चंद्र पृथ्वीच्या सावलीतून बाहेर येईल.

हेही वाचा - Chandra Grahan 2025: राशीनुसार योग्य दान करून जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक स्थिरता मिळवा; जाणून घ्या

हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार का?

7-8 सप्टेंबरच्या रात्री होणारे हे चंद्रग्रहण जगातील अनेक भागांमधून दिसेल आणि यंदाचे हे एकमेव पूर्ण चंद्रग्रहण भारतातून पाहता येईल. भारतातील अनेक शहरांमध्ये हे दृश्य दिसेल. स्थानिक वातावरण आणि आकाश स्वच्छ असल्यास नागरिकांना छतावरून किंवा दुर्बिणीच्या मदतीने ग्रहण पाहता येईल.

हेही वाचा - Grahan Precautions: 7 सप्टेंबरला चंद्रग्रहण, गरोदर महिलांनी काय करु नये?, जाणून घ्या..

सुतक काळ

धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहणाच्या 9 तास आधी सुतक काळ सुरू होतो. त्यामुळे आज, 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12:57 पासून सुतक काळ सुरू होईल आणि दुपारी 1:26 वाजता संपेल. या काळात धार्मिक आणि शुभ कामे टाळण्याचा सल्ला दिला जातो.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.) 
 


सम्बन्धित सामग्री