Sunday, August 31, 2025 04:42:26 PM

'ट्रम्प टॅरिफ सवलती'मुळे पुढील आठवड्यात शेअर बाजारात काय स्थिती असेल? जाणून घ्या

पुढील आठवड्यात सोमवार आणि शुक्रवारी बाजार बंद राहणार आहे. कमी व्यापारी आठवड्यात बाजार पुन्हा तेजीत येईल की घसरण सुरूच राहील? असा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना पडला आहे.

ट्रम्प टॅरिफ सवलतीमुळे पुढील आठवड्यात शेअर बाजारात काय स्थिती असेल जाणून घ्या
stock market
Edited Image

Trump Tariff Effect On Stock Market: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात गोंधळाची परिस्थिती आहे. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 207.43 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. त्याच वेळी, निफ्टीमध्येही 75.9 अंकांची घसरण नोंदली गेली. अशा परिस्थितीत, पुढील आठवड्यात शेअर बाजारात कशी परिस्थिती असेल? हे जाणून घेणे आवश्यक आहे. पुढील आठवड्यात सोमवार आणि शुक्रवारी बाजार बंद राहणार आहे. कमी व्यापारी आठवड्यात बाजार पुन्हा तेजीत येईल की घसरण सुरूच राहील? असा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना पडला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून होणाऱ्या आयातीवर 26% अतिरिक्त शुल्क जाहीर केले होते, जे नंतर 90 दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले होते. यानंतर, बाजारात तेजी अपेक्षित आहे. पुढच्या आठवड्यात बाजार कसा बदलू शकतो, ते थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. 

जागतिक ट्रेंड आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या हालचालींचा बाजारावर परिणाम - 

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, पुढील आठवड्यात शेअर बाजाराची दिशा प्रामुख्याने अमेरिका-चीन टॅरिफ वॉरशी संबंधित घडामोडी आणि विप्रो आणि इन्फोसिस या आयटी कंपन्यांच्या तिमाही निकालांवर अवलंबून असेल. याशिवाय, जागतिक ट्रेंड आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या हालचालींचाही बाजारातील हालचालींवर परिणाम होईल.

हेही वाचा -  गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील आठवड्यात फक्त 3 दिवसच सुरु राहणार शेअर बाजार

शेअर बाजारात अस्थिरता वाढण्याची शक्यता - 

दरम्यान, मास्टर ट्रस्ट ग्रुपचे संचालक पुनीत सिंघानिया यांनी सांगितले की, अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध वाढत असल्याने पुढील आठवडा जागतिक आणि भारतीय बाजारपेठांसाठी अस्थिर राहू शकतो. दोन्ही देश एकमेकांवर एकामागून एक शुल्क लादत आहेत, ज्यामुळे गोंधळ निर्माण होत आहे. या आठवड्यात, भारतात घाऊक किंमत निर्देशांक (WPI) आणि ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित महागाई डेटा प्रसिद्ध केला जाईल. त्याच वेळी, अमेरिका, ब्रिटन आणि चीनमधील महत्त्वाचे आर्थिक डेटा देखील समोर येईल.

हेही वाचा - Gold Price Today: लग्नसराईच्या दिवसात सोन्याचा भाव कमी होईना, जाणून घ्या आजचे दर

ट्रम्प यांची काही देशांना तात्पुरती कर सवलत - 

तथापी, अलिकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवीन टॅरिफ योजना आणली, ज्यामध्ये काही देशांना तात्पुरती सवलत देण्यात आली आहे. परंतु ट्रम्प यांनी कर वाढवून चीनला लक्ष्य केलं आहे. प्रत्युत्तरादाखल, चीननेही अमेरिकन उत्पादनांवरील कर 125% पर्यंत वाढवले, तर अमेरिकेने पुन्हा चीनवर 145% कर लादला. 

देशांतर्गत कंपन्यांच्या निकालांचा बाजारावर परिणाम -  

याशिवाय, रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे ​​वरिष्ठ उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी सांगितले की, सुट्ट्यांमुळे मर्यादित व्यापार सत्रांमध्ये, अमेरिका-चीन आघाडीवरील क्रिया आणि देशांतर्गत कंपन्यांच्या निकालांचा बाजारावर परिणाम होईल. या आठवड्यात, आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपन्या - विप्रो आणि इन्फोसिस तसेच एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक त्यांचे मार्च तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

Disclaimer:  शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!


सम्बन्धित सामग्री