मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या या बैठकीत, विशेषतः मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेत बदल करण्यात आले आहेत. समितीने पहिल्या टप्प्यात 268 वातानुकूलित (एसी) लोकल ट्रेन खरेदी करण्यास मान्यता दिली होती. फडणवीस यांनी मुंबईकरांसाठी बंद दरवाजा असलेल्या लोकल ट्रेनची घोषणा आधीच केली होती. या नवीन गाड्या मेट्रोइतक्याच आधुनिक असणार आहेत. तसेच उच्च दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असतील, असे सांगितले जात आहे. चला जाणून घेऊया या नवीन गाड्या कधी सुरू होतील?
हेही वाचा : Today's Horoscope 2025: आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा आहे? वाचा संपूर्ण राशिभविष्य
माहितीनुसार, पहिली नवीन ट्रेन नोव्हेंबर 2025 पर्यंत तयार होईल, जी जानेवारी 2026 पासून मुंबईत सुरू करण्याचे नियोजन आहे. हा उपक्रम विशेषतः नॉन-एसी गाड्यांची सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतो. सध्याच्या 238 एसी गाड्यांच्या ताफ्यातून त्यांना वेगळे ठेवून एका नवीन दिशेने टाकलेले पाऊल म्हणून याकडे पाहिले जात आहे.
जुने दरवाजे नसलेल्या लोकल ट्रेन्स टप्प्याटप्प्याने बंद केल्या जातील आणि त्या जागी या अत्याधुनिक ट्रेन्स येतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, या नवीन गाड्यांच्या तिकिट दरात कोणतीही वाढ केली जाणार नाही. नवीन लोकल एसी गाड्यांच्या भाड्यात कोणताही बदल होणार नाही.
गेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केवळ मुंबईसाठीच नव्हे तर पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि नागपूरसाठीही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ठाणे आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान 25 किमी लांबीच्या उन्नत रस्त्याच्या बांधकामाला हिरवा कंदील देण्यात आला. या प्रकल्पामुळे ठाणे, नवी मुंबई आणि मध्यवर्ती औद्योगिक क्षेत्रांना जलद कनेक्टिव्हिटी मिळेल. या मार्गामुळे औद्योगिक, निवासी आणि व्यावसायिक क्षेत्रांना चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल. पुण्यातील वाढत्या वाहतुकीच्या समस्येलाही या निर्णयामुळे दिलासा मिळेल.