Saturday, September 06, 2025 09:13:04 AM

हिंदूंच्या भावनांशी खेळतंय कोण ?

तिरुपती बालाजी मंदिराचा प्रसाद चंद्राबाबू नायडू यांच्या गौप्यस्फोटामुळे चर्चेत आहे.

हिंदूंच्या भावनांशी खेळतंय कोण

तिरुपती : दक्षिण भारतातले तिरुपती बालाजी हे मंदिर सर्वात श्रीमंत मंदिरापैकी एक आहे. देशभरातील लोक येथे श्रद्धेने येतात. इथला प्रसाद जोपर्यंत आपण ग्रहण करत नाहीत तोपर्यंत यात्रा पूर्ण होत नाही अशी भक्तांची श्रद्धा आहे. पण आता तिरुपती बालाजी मंदिराचा प्रसाद वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. प्रसादाचे लाडू करण्यासाठी गोमांसाची चरबी, डुकराची चरबी आणि माशाचे तेल यांचा वापर झाल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी उघड केली आहे. लाडूसाठी प्राण्यांच्या चरबीचा वापर जगनमोहन रेड्डी सरकारच्या काळात झाल्याचे नायडू यांनी सांगितले. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या अहवालाआधारे नायडू सरकारने रेड्डी सरकारवर आरोप केला आहे. पाहुयात याचसंदर्भात आजच्या ग्राउंड झिरोमध्ये.....

  • तिरुपतीच्या प्रसादातील भेसळ कारस्थानाचा भाग ?
  • धार्मिक नेत्यांपासून भाविकांपर्यंत सर्वच संतापले
  • तिरुपती बालाजीच्या प्रसादात भेसळीच्या प्रकरणात केंद्राची उडी

केंद्र सरकारने FSSAI ला प्रसादाचे नमुने तपासण्याचे दिले आदेश
आंध्र सरकारकडून केंद्राने मागवला अहवाल

कोण आहे तिरुपती बालाजी ?

जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक मंदिर म्हणजे भारताच्या दक्षिणेतले प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदीर.....देशभरातीलच नाही तर देशाबाहेरूनही अनेक भाविक इथे लाखोंच्या संख्येने येत असतात.....आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुमला पर्वतावर स्थित, हे मंदिर भारतातील सर्वात प्रमुख आणि पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे.....या मंदिराचे मुख्य देव श्री व्यंकटेश्वर स्वामी आहेत, जे स्वतः भगवान विष्णूचे अवतार मानले जातात आणि तिरुमला पर्वतावर त्यांची पत्नी पद्मावतीसोबत राहतात अशी मान्यता आहे.....मान्यतेनुसार, ज्या भक्तांची इच्छा पूर्ण होते ते मंदिरात येतात आणि त्यांचे केस व्यंकटेश्वर स्वामींना अर्पण करतात..... ही परंपरा आजपासूनच नाही तर अनेक शतकांपासून चालत आलेली आहे, जी आजही भाविक मोठ्या भक्तीभावाने पाळतात..... पौराणिक मान्यतेनुसार, भगवान विष्णूंनी स्वामी पुष्करणी नावाच्या तलावाच्या काठावर काही काळ वास्तव्य केले होते..... हे सरोवर तिरुमला टेकडीवर आहे. म्हणूनच शेषनागाच्या सात कुंड्यांच्या आधारे बांधलेल्या तिरुपतीभोवतीच्या डोंगरांना ‘सप्तगिरी’ म्हणतात...... श्री व्यंकटेश्वरैयाचे हे मंदिर सप्तगिरीच्या सातव्या टेकडीवर वसलेले आहे, ज्याला व्यंकटाद्री या नावानेही ओळखले जाते..... मंदिरात असलेली देवाची मूर्ती कोणी बनवली नसून ती स्वतःच निर्माण झाली आहे, असे म्हणतात......आणि या तिरुपती बालाजीच्या प्रसादालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे......

लाडवात प्राण्यांची चरबी ?

मंदिरातील पूजेनंतर भक्तांना प्रसाद दिला जातो, ज्यामध्ये प्रामुख्याने लाडूचा समावेश असतो.... आंध्र प्रदेश येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर म्हणजे तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू अतिशय लोकप्रिय प्रसाद आहे....दररोज लोक पूजेनंतर लाडू प्रसाद म्हणून घेण्यासाठी रांगा लावतात...... पण याच लाडूमध्ये प्राण्यांची चरबी मिसळली जात होती असा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे...... मंदिर ट्रस्ट दररोज सुमारे तीन लाख लाडू बनवते.... हा प्रसाद भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो...... वाय.एस.आर. सरकारच्या कार्यकाळात, कर्नाटक दूध महासंघाच्या 'नंदिनी' ब्रँडच्या तुपाच्या जागी खासगी कंत्राटदाराला तूप पुरवण्याचं कंत्राट दिलं होतं. पुरवठादार बदलल्यानंतर लाडूंच्या गुणवत्तेबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या.
वायएसआरसीपी सरकारच्या कार्यकाळात लाडू बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी मिसळली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. TTD लाडू 'प्रसाद' साठी दररोज सुमारे 10,000 किलो तूप वापरतं.....वायएसआरसीपी सरकारने मोफत भोजन सेवेचा दर्जा खराब केला आणि निकृष्ट साहित्य वापरून भगवान व्यंकटेश्वराच्या लाडूलाही सोडलं नाही, असा आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे.
चंद्राबाबू नायडू यांनी केलेले हे आरोप वायएसआरसीपीने मात्र फेटाळून लावले आहेत.

आंध्रमधील राजकारण

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि चंद्राबाबू नायडू यांचे कट्टर विरोधक जगनमोहन रेड्डी यांच्या काळात तिरुपती देवस्थानाच्या वतीनं भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या प्रसादाच्या लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपतीच्या लाडूंबद्दल केलेल्या मोठ्या दाव्यामुळे मोठा गदारोळ माजला आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानम द्वारे चालवल्या जाणाऱ्या तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात मागणीनुसार, प्रसादाचे लाडू दिले जातात. एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला संबोधित करताना नायडू यांनी दावा केला की, प्रसाद म्हणून भाविकांना दिले जाणारे तिरुमला प्रसादाचे लाडू निकृष्ट पदार्थांपासून बनवले गेले होते, काँग्रेसच्या काळात या लाडूंचं पावित्र्य त्यांनी मुळीच राखलं नाही... चंद्राबाबू नायडूंच्या दाव्यामुळे आंध्र प्रदेशात मोठा वाद निर्माण झाला आहे.... चंद्राबाबू नायडूंचा नेमका आरोप काय ?

  • मागील पाच वर्षांमध्ये जेव्हा वायएसआर काँग्रेस पक्ष सत्तेत होता. तेव्हा त्यांनी पवित्र मानल्या जाणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानचं पावित्र्य घावलंल. 
  • ‘अन्नदानम’ अर्थात जे अन्नदान मंदिरातर्फे केलं जातं त्याच्या दर्जाची पातळीही काँग्रेसच्या काळात खालावलेली होती. तिरुमला तिरुपती देवस्थान येथील लाडू हे पवित्र प्रसाद मानले जातात. या लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला. 
  • आमचं सरकार आल्यापासून आम्ही शुद्ध तुपातील लाडू तयार करण्यास सुरुवात केली आहे. तसंच मंदिरातील अन्नदानात दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जाही आम्ही सुधारला आहे. - चंद्राबाबू नायडू 
  1. तिरुपती बालाजी प्रसाद प्रकरण
  2. 'प्रसादात भेसळ करणे शास्त्रानुसार पाप'
  3. माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
              

सम्बन्धित सामग्री