Sunday, August 31, 2025 04:13:22 PM

'रुपाली चाकणकरांवर मेहरबानी का ?'

रुपाली चाकणकरांवर मेहरबानी का

पुणे : आचारसंहिता लागू होण्याआधी सात आमदारांचा शपथविधी झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांची पुन्हा एकदा महिला आयोगाच्या अध्यक्षपदी तीन वर्षांसाठी नियुक्ती झाली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण आहे. वारंवार रुपाली चाकणकरांवर मेहरबानी का ? असा प्रश्न पक्षातील अनेक सदस्यांकडून विचारला जात आहे. यामुळे अजित पवारांच्या कटकटी वाढल्या आहेत. 

रुपाली चाकणकर यांना वारंवार झुकतं माप दिलं जात असल्यामुळे नाराज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही सदस्यांनी पक्ष सोडला आहे तर काहींनी राजीनामा देण्याची तयारी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आता दीपक मानकर पण पक्षातून बाहेर पडले आहेत. 

अजित पवारांच्या कटकटी वाढल्या
उमेश पाटलांपाठोपाठ दीपक मानकरांचाही राजीनामा
'चाकणकरांवर मेहरबानी का ?'
नाराजांचा दादांना सवाल


सम्बन्धित सामग्री