Thursday, August 21, 2025 12:38:13 AM

हृद्यद्रावक ! मळणी यंत्र उलटून महिलेचा मृत्यू

केहऱ्हाळा मळणी यंत्र उलटून मजूर महिला ठार, एकजण गंभीर

हृद्यद्रावक  मळणी यंत्र उलटून महिलेचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर: संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सिल्लोडच्या  केहऱ्हाळा येथे शेतात मक्याची मळणी करण्यासाठी जात असताना मळणी यंत्र पलटी होऊन एका मजूर महिलेचा मृत्यू झाला आहे. तर एक महिला गंभीर जखमी आहे.या संपूर्ण घटनेमुळे परिसरात हळहळ  व्यक्त केली जात असून मजुरांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. ज्योती सुरडकर असे मृत महिलेचे नाव असून सुरडकर कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. 

कशी घडली घटना? 

साबेर बुढण शेख हे केहऱ्हाळा शिवारातील शेतकरी शब्बीर रशीद पटेल यांच्या शेतातील मका पिकाची मळणी करण्यासाठी ट्रॅक्टरचलित मळणी यंत्र घेऊन जात असताना ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टरला असलेले मळणी यंत्र शेतात पलटी होऊन सदर मळणी यंत्राखाली मजुरी काम करण्यासाठी आलेल्या महिला ज्योती कैलास सुरडकर व मनीषा नंदकिशोर जाधव या मळणी यंत्राखाली दबून गंभीर जखमी झाल्या. जखमी महिलांना ग्रामस्थांच्या मदतीने मळणी यंत्राखालून काढून पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालयात जात असताना फुलंब्रीनजीक ज्योती सुरडकर या महिलेचा मृत्यू झाला. 

दरम्यान  मळणी यंत्र पलटी झाल्याने हि धक्कादायक घटना घडली असून मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे तर ज्योती सुरडकर या महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा व्यक्त केली जात आहे. 


सम्बन्धित सामग्री