Wednesday, August 20, 2025 02:05:52 PM

मद्यप्राशन करून भांडण केल्याने पत्नीने केला पतीचा खून

मद्यपान करून पतीने पत्नीसोबत भांडण केल्याने संतापलेल्या पत्नीने, 'दारू का पितोस?' असं म्हणत मजबूत लाकडी दांडाचा वापर करून पतीच्या डोक्यावर जोरात मारले.

मद्यप्राशन करून भांडण केल्याने पत्नीने केला पतीचा खून

राकेश रामटेके. प्रतिनिधी. गोंदिया: सालेकसा पोलीस स्टेशन हद्दीतील हलबीटोला येथे एक धक्कादायक घटना घडली. मद्यपान करून पतीने पत्नीसोबत भांडण केल्याने संतापलेल्या पत्नीने, 'दारू का पितोस?' असं म्हणत मजबूत लाकडी दांडाचा वापर करून पतीच्या डोक्यावर जोरात मारले. मात्र, डोक्याला जबर मार लागल्याने आणि वेळीच उपचार न मिळाल्याने पतीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सालेकसा पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा: शिक्षकाच्या जाचाला कंटाळून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

नेमकं प्रकरण काय?

मद्यप्राशन करून पती म्हणजेच राजकुमार फत्थू मेश्रामने (वय: 48 वर्षे, रा. हलबीटोला, ता. सालेकसा, जि. गोंदिया) पत्नीसोबत वाद-विवाद करण्यास सुरुवात केली. काही वेळातच, या वादाचे रूपांतर भांडणात झाले. अशातच, संतापलेल्या अवस्थेत पत्नीने म्हणजेच रामकला राजकुमार मेश्रामने (वय: 36 वर्षे) पतीला जाब विचारलं की, 'दारू का पितोस?'. मात्र, एवढ्यावर न थांबता आरडा ओरड करत गोठ्यात असलेला मजबूत लाकडी दांडा घेऊन पत्नीने पतीच्या डोक्यावर जोरात मारले. डोक्याला जबर मार लागल्याने, वेळीच उपचार न मिळाल्याने आणि रात्रभर त्याच अवस्थेत गोठ्यात पडून राहिल्याने पतीचा मृत्यू झाला. या प्रकरणात सालेकसा पोलिसांनी आरोपी पत्नी रामकला मेश्रामला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. 


सम्बन्धित सामग्री