Sunday, August 31, 2025 02:18:12 PM

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यूप्रकरणी राज्य सरकारचा अहवाल सादर करण्यास सुरुवात

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या गर्भवती महिलेला 10 लाख डिपॉझिट न भरल्याने उपचार नकारल्याचा आरोप होत आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यूप्रकरणी राज्य सरकारचा अहवाल सादर करण्यास सुरुवात

पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या गर्भवती महिलेला 10 लाख डिपॉझिट न भरल्याने उपचार नकारल्याचा आरोप होत आहे. तनिषा यांचा मृत्यू झाल्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात राजकीय, सामजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. रुग्णालयाने उपचार नाकारले का? याचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने समिती तयार केली होती. या समितीने आपला अहवाल सरकारला सादर करण्यास सुरुवात केली आहे. 

आज (सोमवारी) राज्य महिला आयोगाची बैठक पुण्यात सुरु आहे  या बैठकीत चौकशी समितीचा अहवाल सादर केला जातोय

पेशंटला ऍडमिट करून न घेणे ही सर्वात मोठी चूक आहे, असा ठपका या अहवालात ठेवला आहे. नर्सिंग होम ऍक्टमधील नियमानुसार डिपॉझिट रक्‍कम मागता येत नाही.

दरम्यान, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून नेमलेल्या समितीने तीन प्रमुख निष्कर्ष काढण्यात आले त्यामध्ये ऍडव्हान्स मागितल्याच्या रागातून तक्रार करण्यात आल्याचे समितीचे म्हणणे आहे. तसेच रुग्णालयाचे वैद्यकीय सल्लेही मानले नाहीत, असाही निष्कर्ष काढण्यात आला आहे.


सम्बन्धित सामग्री