Sunday, August 31, 2025 07:29:49 PM

'उद्धव आजारपणाचा गैरफायदा घेतायत'

शिउबाठाचे प्रमुख उद्धव हे आजारी असल्याचे कारण देत सहानुभूती मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत; असे शिवसेना आमदार योगेश कदम म्हणाले.

उद्धव आजारपणाचा गैरफायदा घेतायत

मुंबई : शिउबाठाचे प्रमुख उद्धव हे आजारी असल्याचे कारण देत सहानुभूती मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत; असे शिवसेना आमदार योगेश कदम म्हणाले. योगेश कदम हे दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे पुत्र आहेत.

उद्धववर तिसऱ्यांदा अँजिओप्लास्टी

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत उतरलेल्या शिउबाठा पक्षप्रमुख उद्धव यांच्यावर तिसऱ्यांदा अँजिओप्लास्टी झाली. अस्वस्थ वाटू लागले, छातीत वेदना होऊ लागल्या. यामुळे उद्धव यांना सोमवारी १४ ऑक्टोबर रोजी सकाळी एच एन रिलायन्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी अँजिओग्राफी केली. रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला. तब्बल १४ ब्लॉकेज आढळल्यामुळे डॉक्टरांनी अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला.

याआधी जुलै २०१२ मध्ये तीन रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्याचे लक्षात आल्यामुळे उद्धव यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. यानंतर नोव्हेंबर २०१२ मध्ये दुसऱ्यांदा उद्धव यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. उद्धव यांनी २०१६ मध्ये अँजिओग्राम करुन घेतला होता. पण त्यावेळी स्थिती नियंत्रणात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. 

अवघ्या पंधरा वर्षांत उद्धव यांच्यावर तीन वेळा अँजिओप्लास्टी करण्यात आली. या व्यतिरिक्त मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळात उद्धव यांना २०२१ मध्ये एका मोठ्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले होते. या शस्त्रक्रियेनंतर उद्धव पुढील काही दिवस मानेचा पट्टा लावत होते. त्यांचं घराबाहेर पडणं बंद झालं होतं.


सम्बन्धित सामग्री