Forest Bathing Trend is Increasing : पूर्वी सूर्यस्नान खूप छान मानले जात असे. अनेक चित्रपटांमध्ये सूर्यस्नान देखील मोठ्या थाटामाटात दाखवले जात असे. सूर्यस्नान करताना लोक सूर्यप्रकाशात आंघोळ करतात. याला सूर्यस्नान म्हणतात. पण काळानुसार, लोक आता सूर्यस्नानाऐवजी वनस्नानावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. 'वनस्नान' ही संकल्पना तुम्हाला माहीत आहे का?
वनस्नान म्हणजे काय? (What is Forest Bathing?)
वनस्नान ऐकताच मनात असा विचार येऊ शकतो की, जंगलात जाऊन थंडगार तलावात आंघोळ करणे असा याचा अर्थ आहे की काय.. सध्या काही साबण, शॅम्पू आणि केसांना लावण्याच्या तेलांच्या जाहिरातींमध्ये आजूबाजूला घनदाट जंगल आणि त्यामध्ये पर्यटन आणि स्नान यांचे दृश्य दाखवलेले आपण पाहतो. त्यामुळे अनेकांचा अशा प्रकारचे स्नान म्हणजे 'वनस्नान' असा समज झालेला असू शकतो. तर, जंगलस्नान करताना हेच केले जाते का? की, या नावामागे दुसरे काही कारण लपलेले आहे. चला जाणून घेऊया..
हेही वाचा - अनवाणी हिरव्यागार गवतावर चालण्याचे अनेक फायदे, जाणून घ्या...
लोक जंगलात स्नान करतात का?
सूर्यस्नानानंतर आता वनस्नाचा ट्रेंड आलेला आहे. पर्यटनाच्या बदलत्या संकल्पनांमध्ये आता 'वनस्नाना'ची एन्ट्री झालेली आहे. वनस्नान म्हणजे लोक जंगलात स्नान करण्यासाठी जात नाहीत. उलट, जंगलात वेळ घालवणे याला 'वनस्नान' म्हणतात. म्हणजेच, वनस्नान करताना तुम्ही हिरव्यागार वनराईच्या भागात जाता. झाडे आणि वनस्पतींमध्ये तुमचा वेळ घालवता. मोकळी हवा, निसर्गाचे सान्निध्य, पशूपक्ष्यांचे आवाज अशा वातावरणात धकाधकीच्या जीवनापासून दूर काही काळ घालवणे आता सर्वांना आवडू लागले आहे.
वनस्नान खूप फायदेशीर आहे
रक्तदाब आणि ताण कमी करण्यासाठी वनस्नान किफायतशीर आहे. तसेच, वनस्नान आपल्या शरीरातील किलर पेशी वाढवते. कर्करोगाच्या ऊतींना मारण्यासाठी किलर पेशी खूप प्रभावी आहेत. याशिवाय, जंगलातील हिरवळीत चालणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
भारतात वनस्नान
भारतात हळूहळू वनस्नान खूप लोकप्रिय होत आहे. परंतु ही भारतासाठी नवीन संकल्पना नाही. आपले ऋषी आणि संत जंगलाशी संबंधित जीवनशैली स्वीकारत असत. तसेच, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात 'वानप्रस्थाश्रम' स्वीकारण्याची (जीवनातील अखेरच्या दिवसांमध्ये वनात तपश्चर्या करण्याची) पद्धतही भारतात पूर्वीच्या काळात अवलंबली जात असे. मात्र, याचे नाव 'वनस्नान' असे नव्हते.
हेही वाचा - शंख वाजवण्याचं धार्मिक महत्त्व आहेच; शिवाय, आरोग्यालाही होतात इतके फायदे! नक्की शिकून घ्या..
वनस्नान या देशातून आले आहे
वनस्नानाचा नवा ट्रेंड जपानमधून आपल्या देशात आला आहे. जपानमध्ये वनस्नानाला 'शिनरीन योकू' म्हणतात. आता ही नवी संकल्पना हळूहळू सगळीकडे रुजत आहे. यामुळे जंगल पर्यटन, निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रदेशांमध्ये वर्षा पर्यटन यांना गती मिळत आहे.