Monday, September 01, 2025 01:46:21 PM

पाणीपुरीचं आरोग्यदायी रहस्य: तुम्ही जाणून घेतलं का?

पाणीपुरी, नाव जरी ऐकले तरी तोंडाला पाणी सुटेल असा हा एक लोकप्रिय आणि चविष्ट भारतीय स्ट्रीट फूड.

पाणीपुरीचं आरोग्यदायी रहस्य तुम्ही  जाणून घेतलं का
Samruddhi Sawant

पाणीपुरी, नाव जरी ऐकले तरी तोंडाला पाणी सुटेल असा हा एक लोकप्रिय आणि चविष्ट भारतीय स्ट्रीट फूड. अलीकडच्या काळात तर पाणीपुरीचे वेगवेगळे फ्लेवर बाजारात पाणीपुरी विक्रेत्यांकडे विकायला असतात. बरं मग पाणीपुरी खायची म्हंटली तर दोन प्रकारची  माणसं पाहायला मिळतात एक आपल्या सारखी लोकं जे  एक प्लेटमध्ये समाधानी होणारे नाही तर 'भय्या थोडा और तिखा दो'  म्हणत चांगलाच ताव मारणारे आणि दुसरीकडे हे ज्यांना पाणीपुरी म्हंटल तर खायची असून टाळाटाळ करावी लागते कारण ती आरोग्यासाठी चांगली नसते आणि ती बनवताना आपल्याला काहीवेळेस अस्वच्छता आणि थोडी खराबी दिसली की लगेच संकोच येतो  मात्र आता कोणताही विचार न करता अगदी निश्चिंतपणे तुम्ही पाणीपुरी खाऊ शकता कारण पाणीपुरी फक्त स्वादिष्टच नाही, तर ती आरोग्यदृष्ट्या देखील फायदेशीर आहे.त्यामुळे तुम्ही बाहेरची बाजारातील पाणीपुरी तिच्या अस्वच्छतेमुळे टाळत असाल तर घरात बनवून तिचा मनसोक्त आस्वाद घेता येईल.

जाणून घ्या पाणीपुरीच्या चवीच्या मागे लपलेले आरोग्य फायदे! 


1. पचन सुधारते:
पाणीपुरीमध्ये असलेल्या मसाल्यामुळे पचन क्रिया सुधारते. पाणीपुरीचे मसाले पचनाला उत्तेजन देतात, ज्यामुळे आहार पचवण्यास मदत होते.

2. वजन कमी करण्यात मदत:
पाणीपुरीमध्ये कमी कॅलरीजअसतात. यामुळे ती हलकी व चविष्ट असली तरी वजन कमी करण्यास मदत करते. 
3. पाणीपुरीतील मसाले सर्दी-तापापासून बचाव करतात:
पाणीपुरीमध्ये वापरण्यात येणारे मसाले, विशेषतः हिंग, आलं आणि काळी मिरी, सर्दी व कंठदुखीपासून आराम देतात आणि शरीरात उब निर्माण करतात.

4. हायड्रेटेड राहण्यास मदत:
पाणीपुरीमध्ये जास्त प्रमाणात पाणी असते, ज्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते म्हणून, हायड्रेशनसाठी पाणीपुरी उपयुक्त ठरू शकते.

5. नॅचरल डिटॉक्सिफिकेशन:
पाणीपुरीमध्ये असलेल्या ताज्या मसाल्यांमुळे शरीरातून विषारी घटक बाहेर पडतात. मसाले शरीराच्या नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेला चालना देतात.

6. मूड चांगला ठेवते:
पाणीपुरी खाणे हे मानसिक आनंद वाढवते. त्यात असलेल्या चवीचा आनंद मूडला ताजेतवाने ठेवतो आणि ताण कमी करण्यास मदत करतो.

7. कायम टवटवीत त्वचा:
पाणीपुरीमध्ये असलेल्या ताज्या घटकांमुळे त्वचेसाठी फायदेशीर आहे. हिंग, मसाले, आणि किटाणुनाशक तत्व त्वचेला टवटवीत ठेवतात.

म्हणून लोकप्रिय असणारी ही पाणीपुरी एक चविष्ट आणि निरोगी स्ट्रीट फूड आहेच पण तरीही तिचे योग्य प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे.कारण जास्त मसालेदार किंवा तेलकट पाणीपुरी देखील पचनास त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे प्रमाणामध्ये सेवन करा आणि ह्या चवदार पदार्थाचा आनंद घ्या आणि त्याचे आरोग्यदायी फायदे मिळवा!


सम्बन्धित सामग्री