Monday, September 01, 2025 09:30:02 AM

Chanakya Niti : जी व्यक्ती या गोष्टी समजून घेत नाही, तिच्या पदरी सुख-समाधान नाहीच

आचार्य चाणक्य यांनी सांगितलंय जर काही गोष्टी वेळेवर समजल्या नाहीत तर माणसाचं आयुष्य दुःख आणि अपयशाने भरले जाऊ शकते. चाणक्य यांनी सर्वांसाठीच या गोष्टी सांगितल्या आहेत.

chanakya niti  जी व्यक्ती या गोष्टी समजून घेत नाही तिच्या पदरी सुख-समाधान नाहीच

Chanakya Niti In Marathi : आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या तत्त्वांविषयी सखोलपणे चर्चा केली आहे. ही तत्त्वे चाणक्यनीती म्हणून ओळखली जातात. आचार्य चाणक्यांनी जीवनात अगदी लहान वाटणाऱ्या पण सर्व जीवनावर मोठा प्रभाव टाकणाऱ्या सवयी आणि मानसिकतेविषयी सांगितलं आहे. आपण यातल्याच अशा काही मोजक्या गोष्टी  आता जाणून घेणार आहोत की, ज्या नाही समजून घेतल्या तर, जीवनातील सुख-समाधान हरवून जाईल.

एकमेकांना समजून घेणे
आचार्य चाणक्य यांनी सांगितलंय जर काही गोष्टी वेळेवर समजल्या नाहीत तर माणसाचं आयुष्य दुःख आणि अपयशाने भरले जाऊ शकते. चाणक्य यांनी सर्वांसाठीच या गोष्टी सांगितल्या आहेत. जो पुरुष महिलांना समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही किंवा ज्या महिला घरातील लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत, त्यांना कोणत्याही गोष्टीतून सुख-शांती, समाधान मिळू शकत नाही. त्यांच्या प्रयत्नांनी त्यांना काही गोष्टी मिळतीलही.. पण त्यांच्या आनंद काही काळापुरताच टिकेल. कारण, मानवी जीवनात सामाजिक आणि कौटुंबिक नातेसंबंध अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यात जर कडवटपणा आला तर, त्याचा संपूर्ण आयुष्यावर परिणाम होतो. अर्थातच, ही बाब सर्वांनाच लागू होत असल्याने याचा एकतर्फी समजून घेण्यात उपयोग होत नाही.

हेही वाचा - Office Stress : कामामुळे ताण वाढतोय? फक्त 10 मिनिटे करा ही 3 योगासने; लगेच मिळेल आराम

स्त्रीला आदर दिला पाहिजे
चाणक्य म्हणतात की स्त्रीचं मूल्यांकन फक्त तिच्या सौंदर्याने नाही तर तिच्या समजुतीने, वागण्याने आणि आदरानेदेखील केलं पाहिजे. जो पुरुष स्त्रीचा आदर करतो तोच खरा आनंद अनुभवू शकतो. जो असं करत नाही, त्याच्या आयुष्यात नेहमीच अशांतता असते.

पैशांचा योग्य पद्धतीने विनियोग
पैसा हा केवळ आराम आणि चैनीचं साधन नाही तर संकटाच्या काळात तो सर्वात मोठा आधार असतो. पैसा कमवणं जितकं महत्त्वाचं आहे तितकाच तो विवेकीपणे वापरणंही महत्त्वाचं आहे. जो माणूस पैशाचं महत्त्व समजत नाही किंवा चुकीच्या मार्गाने खर्च करतो तो कधीही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहू शकत नाही. जो माणूस अनावश्यकपणे पैसे खर्च करतो, त्याला नेहमी आर्थिक चणचण भासत राहते आणि तो चिंतेत राहतो.

वेळेचे महत्त्व
वेळ ही सर्वात मोठी संपत्ती आहे, ती एकदा गेली की परत येत नाही. जो माणूस वेळ वाया घालवतो तो आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही. जो माणूस वेळेचा योग्य वापर करत नाही, तो हळूहळू आपल्या ध्येयांपासून आणि स्वप्नांपासून दूर जातो. अशा लोकांना शेवटी फक्त पश्चात्तापच मिळतो.

हेही वाचा - गरोदरपणात या गोष्टीचा बाळाच्या मनावर होतो वाईट परिणाम; मूल भित्रे होऊ शकते

(Disclaimer : ही बातमी माहिती देण्याच्या उद्देशाने दिली आहे. यातून जय महाराष्ट्र कसलाही दावा करत नाही.)


सम्बन्धित सामग्री