Sunday, August 31, 2025 11:48:24 AM

ACC's New Guidelines: कोविड, फ्लू आणि न्यूमोनिया लस हृदय रुग्णांसाठी आवश्यक; अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीचा सल्ला

ACC लेखन समितीचे अध्यक्ष पॉल हेडेनरीच यांनी सांगितले की, हृदयरोग्यांसाठी संसर्गजन्य श्वसन रोग आणि इतर गंभीर आजारांपासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

accs new guidelines कोविड फ्लू आणि न्यूमोनिया लस हृदय रुग्णांसाठी आवश्यक अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीचा सल्ला

ACC's New Guidelines: हृदयरोगाने ग्रस्त प्रौढांनी कोविड-19, इन्फ्लूएंझा (फ्लू), श्वसन सिन्सिटियल व्हायरस (RSV), न्यूमोनिया आणि हर्पिस झोस्टर (शिंगल्स) सारख्या आजारांविरुद्ध लसीकरण करणे आवश्यक असल्याचे अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी (ACC) ने आपल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांत स्पष्ट केले आहे. या दस्तऐवजात प्रत्येक लसीसाठी वैज्ञानिक पुरावे दिले असून, रुग्ण आणि डॉक्टरांमधील संवाद सोपा करण्यासाठी वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरेदेखील समाविष्ट करण्यात आली आहेत.

ACC लेखन समितीचे अध्यक्ष पॉल हेडेनरीच यांनी सांगितले की, हृदयरोग्यांसाठी संसर्गजन्य श्वसन रोग आणि इतर गंभीर आजारांपासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु कोणती लस किती वेळा घ्यावी आणि ती का आवश्यक आहे, हे लोकांना नीट समजून सांगणे गरजेचे आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचा उद्देश डॉक्टरांना रुग्णांशी उघडपणे चर्चा करण्यास प्रवृत्त करणे आणि लसीकरणाला नियमित उपचार व प्रतिबंधाचा एक महत्त्वाचा भाग बनवणे हा आहे.

लसीकरणाचे फायदे 

दरम्यान, संशोधनातून दिसून आले आहे की, लसींमुळे रुग्णालयात दाखल होण्याचा आणि मृत्यूचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. तथापी, अलीकडील एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की केवळ 30 टक्के प्राथमिक काळजी घेणारे डॉक्टर त्यांच्या रुग्णांच्या लसीकरणाची स्थिती तपासतात.

हेही वाचा - Vitamin Deficiency: वारंवार दम लागतोय? कदाचित 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेची असू शकतात लक्षणे

कोणत्या वयोगटासाठी कोणती लस?

सर्व प्रौढांना दरवर्षी फ्लूची लस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे, ज्यामुळे हृदयरोग, हृदयाशी संबंधित मृत्यू आणि इतर कारणांमुळे होणारे मृत्यू कमी होतात. परंतु 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी नाकाची फ्लूची लस घेण्याची शिफारस केलेली नाही. 19 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या हृदयरोग्यांसाठी न्यूमोनिया लस आवश्यक आहे, जी न्यूमोनिया, बॅक्टेरिया आणि मेनिंजायटीसपासून संरक्षण करते.

हेही वाचा - Eat Raw Tomato Everyday : दररोज एक तरी कच्चा टोमॅटो खा.. हृदयासाठी आश्चर्यकारक फायद्यांसह मूडही होईल फ्रेश

तथापी, ACC ने 75 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी हंगामी COVID लस आणि RSV लस घेण्याची शिफारस केली आहे. त्याच वेळी, 50-74 वर्षे वयोगटातील हृदयरोग्यांनी देखील RSV लस घ्यावी. ही लस गंभीर श्वसन आजारांपासून संरक्षण करते. तसेच 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना शिंगल्स लस घेण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. या मार्गदर्शक तत्त्वांमुळे हृदयरोग्यांमध्ये लसीकरणाचे महत्त्व अधिक ठळकपणे अधोरेखित झाले असून, डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवाद मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
 


सम्बन्धित सामग्री