Wednesday, August 20, 2025 03:01:45 PM

Do Not Peel Soaked Almonds: भिजवलेले बदाम सोलून खाताय? जाणून घ्या पोषणतज्ज्ञांचा सल्ला

भिजवलेल्या बदामांची साल काढू नका, त्यात फायबर, अँटिऑक्सिडंट आणि पोषकतत्वं भरपूर; पचन, हृदय आरोग्य व रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयुक्त असल्याचे तज्ज्ञांचे मत.

do not peel soaked almonds भिजवलेले बदाम सोलून खाताय जाणून घ्या पोषणतज्ज्ञांचा सल्ला

Soaked Almonds: आपल्या रोजच्या आहारात बदाम हे महत्त्वाचे स्थान पटकावले आहे. मेंदूला चालना देणे, हृदय निरोगी ठेवणे, त्वचेला चमक देणे आणि शरीरास ऊर्जा पुरवणे यासाठी बदाम उपयुक्त मानले जातात. अनेकजण बदाम रात्री भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या साली काढून खातात. मात्र, पोषणतज्ज्ञांच्या मते ही पद्धत चुकीची ठरू शकते.

बदामाची साल केवळ एक आवरण नसून त्यात शरीराला उपयुक्त असणारी अनेक पोषकद्रव्ये असतात. बदामाच्या सालीत पॉलीफेनॉल, व्हिटॅमिन ई आणि आहारातील फायबर यांचे प्रमाण भरपूर असते. हे घटक शरीरातील जळजळ कमी करण्यास, ऑक्सिडेटिव्ह ताण दूर करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

हेही वाचा: Fruits to avoid during monsoon: पावसाळ्यात 'ही' 5 फळ खाणं आहे धोकादायक; जाणून घ्या

रक्तदाब नियंत्रित ठेवतो
बदामामध्ये मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त आहे. नियमित बदाम सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो.

मूड सुधारण्यास मदत
बदामामध्ये असणारे ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो आम्ल मूड नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. केळीसारख्या बी६ व्हिटॅमिनयुक्त आहारासोबत बदाम घेतल्याने सेरोटोनिनची निर्मिती वाढते आणि नैसर्गिकरित्या मनःस्थितीत सुधारणा होते.

वजन नियंत्रणासाठी उपयुक्त
बदामामध्ये कार्बोहायड्रेट्स कमी आणि प्रथिने व फायबर मुबलक असल्यामुळे ते पोट भरल्याची भावना देतात. परिणामी भूक कमी होते आणि वजन नियंत्रणात राहते.

हेही वाचा: सद्गुरुंच्या मते हे '3' सुपरफूड्स पचनासाठी वरदान; रक्तातील साखरही ठेवतील नियंत्रणात

रक्तातील साखर संतुलित ठेवतो
बदाम इन्सुलिन प्रतिसाद सुधारण्यात मदत करतात, त्यामुळे मधुमेह किंवा मधुमेहापूर्व स्थितीत असणाऱ्या लोकांसाठी बदाम सेवन फायदेशीर ठरते.

पचनक्रिया सुधारते
बदामातील फायबरमुळे आतड्यांच्या हालचालींना चालना मिळते आणि पचनसंस्थेतील चांगल्या बॅक्टेरियांची वाढ होते. त्यामुळे बदामाची साल पचायला अवघड नसून पचनाला मदत करणारी आहे.

पोषणतज्ज्ञांच्या मते, भिजवलेले बदाम सोलून खाण्याऐवजी त्यासह खाल्ले पाहिजे. त्यामुळे शरीराला अधिक पोषणमूल्ये मिळतात आणि एकूणच आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
 


सम्बन्धित सामग्री