Wednesday, August 20, 2025 09:24:36 AM

Hypnic Jerk: हायपनिक जर्कमुळे झोपेत असताना तुम्ही सुद्धा अचानक दचकून उठता का?

झोपेत असताना अचानक आपण खाली पडत आहोत असा भास निर्माण होतो किंवा अनेकदा आपल्याला वाईट स्वप्न पडतात. नेमकं कोणत्या कारणामुळे या समस्या होत आहेत? चला तर सविस्तर जाणून घेऊया.

hypnic jerk हायपनिक जर्कमुळे झोपेत असताना तुम्ही सुद्धा अचानक दचकून उठता का

झोपेत असताना अचानक आपण खाली पडत आहोत असा भास निर्माण होतो किंवा अनेकदा आपल्याला वाईट स्वप्न पडतात. ज्यामुळे अचानक आपल्याला झोपेतून जाग येते. त्यानंतर, कितीही प्रयत्न केला तरीदेखील झोप काही केल्या लागत नाही. अनेकांना हा प्रश्न पडतो आणि तो म्हणजे नेमकं कोणत्या कारणामुळे या समस्या होत आहेत? चला तर सविस्तर जाणून घेऊया.

 

काय आहे हायपनिक जर्क (Hypnic Jerk)?

हायपनिक जर्क (Hypnic Jerk) किंवा स्लीप स्टार्ट्स म्हणजे एक प्रकारचा अचानक आणि अकस्मात होणारा स्नायूंचा झटका आहे, जो झोपेत जाण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात (light sleep stage) अनुभवला जातो. हा झटका सहसा हात, पाय किंवा संपूर्ण शरीराला प्रभावित करू शकतो. त्यामुळे काही लोकांना असे वाटते की ते पडत आहेत किंवा कोणीतरी त्यांना हलवत आहे.

 

हायपनिक जर्क होण्यामागील काही वैज्ञानिक कारणे:

 

1 - मेंदू आणि शरीर यामधील संक्रमण:

झोपेच्या सुरुवातीच्या टप्प्यात मेंदू हळूहळू शरीराला रिलॅक्स करण्यास सांगतो. मात्र, कधी कधी स्नायू पूर्णपणे सैल होण्याआधीच मेंदू चुकीचा संदेश पाठवतो आणि त्यामुळे स्नायूंना अचानक झटका बसतो.

 

2. जीवशास्त्रीय कारणे (Biological Factors):

मेंदूमध्ये झोपेच्या वेळी न्यूरॉनल मिसफायरिंग होऊ शकते. यामुळे स्नायूंमध्ये अनियंत्रितपणे हालचाल होऊ लागते. हा झटका एक प्रकारची अनुवांशिक वैशिष्ट्य असू शकते आणि काही लोकांमध्ये या गोष्टी जास्त प्रमाणात दिसून येतो.

 

3. तणाव आणि चिंता (Stress & Anxiety):

जास्त प्रमाणात मानसिक तणाव घेतल्यामुळे, सारखं चिंतेत राहिल्यामुळे किंवा तुम्ही सतत विचार करत असाल तर झोपेच्या वेळी मेंदू अधिक सक्रिय राहतो. ज्यामुळे हायपनिक जर्क होण्याची शक्यता जास्त असते.

 

4. जास्त कॅफिन किंवा स्टिम्युलंट्स (Caffeine & Stimulants):

झोपण्यापूर्वी चहा, कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्सच्या सेवनामुळे मेंदू अधिक जागरूक राहतो. ज्यामुळे झोपताना व्यत्यय येतो. या कारणामुळे स्नायूंना अधिक झटके बसतात.

 

5. थकवा किंवा झोपेच्या कमतरतेमुळे (Sleep Deprivation):

शरीर आणि मेंदू जर खूप थकलेले असतील तर झोपेच्या संक्रमणात अडथळा निर्माण होतो आणि हायपनिक जर्कची शक्यता वाढते.

 

6. व्यायाम आणि शारीरिक श्रम:

झोपण्याच्या काही वेळा पूर्वीच व्यायाम केल्यामुळे स्नायू अधिक तणावात राहतात. त्यामुळे शरीराला शांत करण्यास मेंदूला वेळ लागतो. यामुळे हायपनिक जर्क होण्याची शक्यता जास्त असते.

 

हेही वाचा: एप्रिल महिन्यात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे? जाणून घ्या
 


हायपनिक जर्क टाळण्यासाठी काय करावे?

 

1. झोपण्याची चांगली वेळ ठरवा: दररोज ठरलेल्या वेळी झोपल्यामुळे आणि उठल्यामुळे हायपनिक जर्कचा धोका टाळता येतो.

 

2. कॅफिन (Caffeine) आणि स्टिम्युलंट्सचे (Stimulants) सेवन करणे टाळा: झोपण्याच्या किमान 4 - 5 तास आधी चहा, कॉफी किंवा मद्यपान करणे टाळावे.

 

3. स्नायूंना शांत करा: झोपण्याआधी शक्य तितके अवजड व्यायाम करणे टाळावे. झोपण्यापूर्वी ध्यानधारणा केल्यामुळे हायपनिक जर्क होण्याची शक्यता कमी होते आणि शांत झोप लागण्यास मदत होते.

 

4. तणाव कमी करा: झोपण्यापूर्वी वाचन केल्यामुळे किंवा हलकी गाणी ऐकल्यामुळे तणाव कमी होतो.

 

5. संतुलित आहार घ्या: झोपण्यापूर्वी झाड किंवा मसालेदार पदार्थ खाणे टाळा. ज्यामुळे हायपनिक जर्क होण्याची शक्यता कमी होते.

 

6. मोबाईल आणि स्क्रीनपासून दूर रहा: झोपण्याच्या 30 ते 45 मिनिटांपूर्वी मोबाइल, टीव्ही आणि लॅपटॉपचा वापर कमी करा. ज्यामुळे हायपनिक जर्कचा धोका कमी होतो.

 

(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री