Vitamin Deficiency: आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे अनेकांना आरोग्याशी संबंधित समस्या भेडसावत आहेत. थोडं चालल्यानंतरच थकवा येणे, हलका व्यायाम केला तरी दम लागणे हे लक्षणे सर्वसाधारण मानली जातात. पण ही केवळ सामान्य गोष्ट नाही. कधी कधी यामागे शरीरात आवश्यक पोषक तत्त्वांची कमतरता असते. त्यापैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे व्हिटॅमिन डीची कमतरता.
श्वास घेण्यास त्रास का होतो?
अॅलर्जी, दमा, ब्राँकायटिस, संसर्ग किंवा फुफ्फुसांचे आजार यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. मात्र, अशी समस्या नसतानाही जर वारंवार दम लागत असेल, तर ते व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे असू शकते. व्हिटॅमिन डी कमी झाल्यास फुफ्फुसांवर ताण येतो, श्वास घेण्यास त्रास होतो, छातीत घट्टपणा जाणवतो आणि लवकर थकवा येतो. दीर्घकाळ ही कमतरता राहिल्यास दमा आणि ब्राँकायटिसचा धोका वाढतो.
हेही वाचा - Eat Raw Tomato Everyday : दररोज एक तरी कच्चा टोमॅटो खा.. हृदयासाठी आश्चर्यकारक फायद्यांसह मूडही होईल फ्रेश
व्हिटॅमिन डीचे महत्त्व -
हाडे मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक
फुफ्फुसांचे कार्य सुरळीत ठेवते
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
शरीरातील सूज कमी करते
हेही वाचा - Turmeric Water Benefits: हळदीचे पाणी आरोग्यासाठी सुपरड्रिंक, दररोज प्यायल्यास होतील 'हे ' 6 आश्चर्यकारक फायदे
व्हिटॅमिन डीची कमतरता कशी भरून काढावी?
सकाळी 10-15 मिनिटे सूर्यप्रकाशात राहिल्यास शरीराला पुरेसं व्हिटॅमिन डी मिळतं. यासाठी सकाळचा सौम्य सूर्यप्रकाश सर्वोत्तम मानला जातो.
आहारात या गोष्टींचा समावेश करा -
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ (दही, पनीर)
मासे आणि अंडी
मांस
लिंबूवर्गीय फळे
या पदार्थांचा नियमित आहारात समावेश केल्यास व्हिटॅमिन डीची पातळी नैसर्गिकरीत्या वाढते आणि श्वसनाच्या समस्या कमी होण्यास मदत होते. वारंवार दम लागत असेल किंवा थकवा येत असेल, तर ते केवळ शारीरिक कमजोरी नसून व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे संकेत असू शकतात. योग्य आहार आणि सूर्यप्रकाश यामुळे ही समस्या टाळता येऊ शकते.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)