Friendship Day 2025 : फ्रेंडशिप डे हा मित्र-मैत्रिणींमधील खास, नाजूक पण अतूट नात्याचा उत्सव आहे. हा दिवस आपल्या जीवनात मैत्रीचे महत्त्व लक्षात आणून देतो. भारतासह अनेक देशांमध्ये दरवर्षी इंग्रजी कॅलेंडरमधील ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी 'फ्रेंडशिप डे' साजरा केला जातो. 2025 मध्ये, फ्रेंडशिप डे आज 3 ऑगस्ट रोजी आहे.
2011 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने घोषित केल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय 'फ्रेंडशिप डे' दरवर्षी 30 जुलै रोजी साजरा केला जातो. या उत्सवामागील कल्पना अशी आहे की लोक, देश, संस्कृती आणि व्यक्तींमधील मैत्री शांततेच्या प्रयत्नांना प्रेरणा देऊ शकते आणि जगभरातील विविध समुदायांमध्ये मित्रत्वाचे पूल बांधू शकते.
'फ्रेंडशिप डे' हा मैत्रीचे महत्त्व वाढवण्यासाठी, आपल्या भावनिक कल्याणात मित्रांची भूमिका ओळखण्यासाठी आणि नवीन नातेसंबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित आहे. लोक सहसा त्यांच्या मित्रांसोबत भेटवस्तू, शुभेच्छा पत्र किंवा संदेशांची देवाणघेवाण करून, आठवणींना उजाळा देत आणि एकत्र वेळ घालवून मैत्री दिन साजरा करतात.
'मैत्री, विशेषतः तरुणांमधील, एक "विशेष प्रकारची शक्ती" आहे. कारण ती भाषा, संप्रदाय आणि इतिहास ओलांडून आपल्याला एकत्र आणू शकते. मैत्री आपल्याला निर्णय देण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकण्यास प्रवृत्त करते. जेव्हा एकमेकांपासून दूर जाण्यासारखी किंवा मने तुटण्यासाठी परिस्थिती असते, तेव्हा मानवांचे आणि मानवतेचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी मैत्री कामाला येते. ही भावना जेव्हा विविध संस्कृती आणि समुदायांदरम्यान वाढवली जाते, तेव्हा मैत्रीची भावना अत्यंत उच्च पातळीला पोहोचते. ती समेट किंवा समझोत्यासाठी एक 'ब्लूप्रिंट' बनते," असा संयुक्त राष्ट्रांचा विश्वास आहे. यामुळे या दिवसाला जागतिक संघटनांकडूनही मोठे प्रोत्साहन दिले जाते.
हेही वाचा - Friendship Day 2025: मैत्रीचा दिवस इतका खास का आहे?, मनोरंजक इतिहास जाणून घ्या...
तुमच्या सर्व मित्रांना शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम स्टेटसवर काही शुभेच्छा संदेश ठेवू शकता.
"मित्र म्हणजे आपण निवडलेले कुटुंब. मैत्री दिनाच्या शुभेच्छा!"
"खरी मैत्री तीच असते, जी फक्त जवळ असल्यानंतरच नाही, तर दूर असतानाही टिकून राहते आणि अनेक वर्षांनी भेटल्यानंतरही काहीही बदलत नाही. मैत्री दिनाच्या शुभेच्छा!"
"मित्र म्हणजे आपल्याला सुखात आणि दुःखात सोबत असलेले कुटुंबीय. मैत्री दिनाच्या शुभेच्छा!"
"मित्र म्हणजे अत्यंत आपुलकीने विचारपूस करणारे आणि काही वेळेस खोडकरपणा करणारे कुटुंबीय. मैत्री दिनाच्या शुभेच्छा!"
"माझ्या जगाला वेगवेगळ्या रंगांनी सुशोभित लोकांना मी आजचा दिवस समर्पित करत आहे!!! मैत्री दिनाच्या शुभेच्छा"
"तुम्ही कोणाला किती काळापासून ओळखता यावर मैत्री किती घट्ट असेल, हे ठरत नाही. तर, एकदा मैत्री झाल्यानंतर ती दररोज अधिक बहरत गेली, यावर ठरते. मैत्री दिनाच्या शुभेच्छा!"
"मैत्री म्हणजे 'दुधात मिसळलेली साखर,' ज्यांना वेगळं करताच येत नाही! मैत्री दिनाच्या शुभेच्छा"
"चेहऱ्यावर हास्य फुलवणाऱ्या, जुन्या आठवणींना ताजे करणाऱ्या, अतूट बंधांना नावीन्य देणाऱ्या मैत्री दिनाच्या शुभेच्छा!"
"प्रेम, हास्य आणि तिखट-गोड, खमंग, चवदार आठवणींनी भरलेल्या मैत्री दिनाच्या शुभेच्छा!"
"आपण सोबत केलेल्या सर्व खोड्या, उपद्व्याप, वेडेपणा, हुशारी, एकमेकांना दिलेली उभारी या सर्वांना एकत्र शिदोरीत बांधून आणि हा 'गोपाळकाला' घेऊन दररोज सोबत करणाऱ्या मैत्रीसाठी शुभेच्छा. मैत्री दिनाच्या शुभेच्छा!"
"खरे मित्र कधीही दूर नसतात. कदाचित अंतर जमीनीवर असेल, पण मनात कधीच नाही. मैत्री दिनाच्या शुभेच्छा!"
"मैत्री ही जीवनातील सर्वात मोठी भेट आहे. माझ्या सर्व प्रिय मित्रांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा!"
हेही वाचा - हे आहेत इनडोअर प्लांट्सचे बेस्ट ऑप्शन्स; खोलीत लटकणाऱ्या कुंड्यांमध्ये छान दिसतील