Sunday, August 31, 2025 01:14:02 PM

ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवस वैध असतं? काय आहे नियम

भारतातील प्रत्येक ड्रायव्हिंग लायसन्सची एक ठराविक वैधता म्हणजे व्हॅलेडिटी असते. त्यानंतर त्याचे नूतनीकरण म्हणजे रिन्यूअल करावं लागतं.

ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवस वैध असतं काय आहे नियम
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवस वैध असतं? काय आहे नियम

ड्रायव्हिंग लायसन्स हा वाहन चालकांसाठी एक अत्यावश्यक डाक्यूमेंट आहे. हा डाक्यूमेंट कोणत्याही व्यक्तीला कायदेशीररित्या रस्त्यांवर वाहन चालवण्याची परवानगी देतो. मोटर वाहन अधिनियम 1988 अंतर्गत भारतात ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय गाडी चालवणं बेकायदेशीर मानलं जातं. प्रत्येक ड्रायव्हिंग लायसन्सची एक ठराविक वैधता म्हणजे व्हॅलेडिटी असते. त्यानंतर त्याचे नूतनीकरण म्हणजे रिन्यूअल करावं लागतं.

ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता संपल्यानंतर लगेचच ते अमान्य ठरत नाही. एकूण ३० दिवसांचा ग्रेस पीरियड यासाठी दिला जातो. या काळात तुम्ही कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय लायसन्सचे नूतनीकरण म्हणजे रिन्युअल करू शकता. या कालावधीत तुम्हाला केवळ ठराविक फी भरावी लागते आणि तुमचे लायसन्स वैध राहतं.

रिन्युअलसाठी किती फी लागते?
जर तुम्ही तुमचं लायसन्स ३० दिवसांच्या आत रिन्यू केल्यास तुम्हाला फक्त ४०० रूपये शुल्क आकारलं जातं. जर तुम्ही ३० दिवसांनंतर आणि एका वर्षाच्या आत रिन्यू केल्यास तुम्हाला विलंब शुल्कासह १५०० रूपये द्यावे लागतात आणि एक वर्षाहून अधिक उशीर झाल्यास तुमचं लायसन्स रद्द होऊ शकतं. त्यानंतर तुम्हाला नव्यानं पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून नवीन लायसन्स काढावं लागेल.

हेही वाचा - कच्ची कैरी ठरते आरोग्यासाठी फायदेशीर; जाणून घ्या काय आहेत फायदे

लायसन्य रिन्यूअलसाठी कोणती कागदपत्रे लागतात?
लायसन्स रिन्युअलसाठी जुने (मूळ) ड्रायव्हिंग लायसन्स, वैद्यकीय प्रमाणपत्र (४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या चालकांसाठी), पत्ता आणि ओळख पुरावा (आधारकार्ड, पॅनकार्ड इत्यादी), पासपोर्ट साईज फोटो आणि रिन्युअलसाठी लागू असलेले शुल्क इतके डाक्यूमेंट लागतात. 

हेही वाचा - Who Invented Lift In India: भारतामध्ये लिफ्टचा शोध कोणी लावला? जाणून घ्या

लायसन्स रिन्युअल नाही केल्यास काय होतं?
जर ३० दिवसांच्या आत लायसन्सचे नूतनीकरण केलं नाही. तर दंड लागू होतो. तसंच लायसन्स एक वर्षाच्या आत रिन्यू न केल्यास ते कायमचं रद्द होऊ शकतं. अशा परिस्थितीत पुन्हा नवीन लायसन्स मिळवण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया अर्ज, टेस्ट आणि प्रशिक्षण याची झंझट पार करावं लागतं.


सम्बन्धित सामग्री