Sunday, August 31, 2025 11:32:18 AM

तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे फायदे जाणून घ्या..

तांब्याच्या भांड्यात (कॉपरच्या पाण्याच्या भांड्यात) पाणी साठवून ते पिणे ही आयुर्वेदात प्राचीन काळापासून वापरली जाणारी एक आरोग्यवर्धक पद्धत आहे.

तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे फायदे जाणून घ्या

मुंबई : तांब्याच्या भांड्यात (कॉपरच्या पाण्याच्या भांड्यात) पाणी साठवून ते पिणे ही आयुर्वेदात प्राचीन काळापासून वापरली जाणारी एक आरोग्यवर्धक पद्धत आहे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. आपण बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलं असेल की तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे चांगले असते. मात्र तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या... 

प्रतिकारशक्ती वाढवते
तांब्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-वायरल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे पाणी पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी, खोकला, ताप यांसारख्या संसर्गांपासून संरक्षण मिळते.

पचन सुधारते
तांब्याचे पाणी पचनक्रियेला मदत करते. बद्धकोष्ठता, गॅस, आम्लपित्त अशा त्रासांपासून आराम मिळतो. पचनसंस्थेतील हालचाली सुधारतात.

हेही वाचा : Lemon Peel Benefits: लिंबाची साल फेकून देताय? मग हे नक्की करा...

डिटॉक्सिफिकेशनसाठी मदत करते 
तांब्याचे पाणी शरीरातील विषारी घटक (toxins) बाहेर टाकण्याचे काम करते. यामुळे त्वचा तजेलदार राहते आणि शरीर हलके वाटते.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
तांब्याचे पाणी त्वचेसाठी चांगले असते. तांब्यातील भांड्यात पाणी प्यायल्याने त्वचेवरील डाग दूर होण्यास मदत होते. केस गळणे, केस पांढरे होणे यावरही फायदा होतो.

हृदयासाठी उपयोगी
तांब्याचे पाणी कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवते आणि रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे हृदय विकारांचा धोका कमी होतो.

एका तांब्याच्या भांड्यात रात्री पाणी भरून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी उपाशी पोट प्या. त्याचा फायदा शरीराला होताना पाहायला मिळेल. तांब्याच्या भांंड्यात 6 ते 8 तास पाणी साठवलेलं असावं.

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री