Make Your Relation Strong : नव्याचे नऊ दिवस.. ही म्हण आपल्या सर्वांना माहीत आहेच.. लग्नानंतरही काहीसं असंच होतं.. आताच्या धावपळीच्या युगात तर ते जास्तच जाणवू लागलंय.. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस किंवा काही आठवडे-महिने गोड वाटतात.. पण जशी जीवनातल्या इतर गोष्टींशी जळवून घ्यायची वेळ येऊ लागते, तशी जोडप्यांना 'शादी के साईड इफेक्टस' दिसू लागलेत, असंच वाटू लागतं. पण हीच काळ असा असतो, जिथे कडवटपणा येऊ नये, यासाठी दोघांनी प्रयास करणं आवश्यक असतं.
लग्न म्हटलं की आयुष्यभराची एक भावनिक, मानसिक आणि सामाजिक बांधिलकी असते. सुरुवातीचा काळ म्हणजे हनीमून पीरियड. प्रेम, आकर्षण, एकत्र वेळ घालवण्याचा उत्साह आणि रोमँटिक क्षणांनी भरलेला असतो. पण जसजसं पहिले सहा महिने किंवा वर्ष पूर्ण होते, तसतसे नात्याच्या वास्तवाची खरी चव नात्याला भलत्याच दिशेने नेतेय की काय, अशी परिस्थिती होते. हाच खरा संयम दाखवण्याचा आणि संयमाची परीक्षा बघणारा काळ असतो. मात्र, झटपट कुठल्याही निष्कर्षापर्यंत न येणं किंवा एखादं असं पाऊल न उचलणं अत्यंत महत्त्वाचं असतं. दोघांसाठीही हा काळ खऱ्या अर्थाने धीर धरण्याचा असतो.
हेही वाचा - मुले रात्री लवकर झोपत नाहीत? शांत झोपवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
प्रेम असलं की अनेक जोडपी लग्न करण्याची घाई करतात. लग्नासाठी काय लागतं? दोघांची संमती, रहायला घर आणि पैसे, प्रेम तर आहेच. असं म्हणून अनेक जोडपी लग्न करण्याचा निर्णय घेतात. पण त्यावेळी ते भविष्याचा विचार करत नाहीत किंवा प्रॅक्टिकल गोष्टींचा विचारच करत नाहीत.
लग्न म्हटलं की, आयुष्यभराची एक भावनिक, मानसिक आणि सामाजिक बांधिलकी असते. सुरुवातीचा काळ म्हणजे हनीमून पीरियड. प्रेम, आकर्षण, एकत्र वेळ घालवण्याचा उत्साह आणि रोमँटिक क्षणांनी भरलेला असतो. पण जसजसं पहिलं वर्ष पूर्ण होते, तसतसे नात्याच्या वास्तवाची जाणीव होऊ लागते. मग ते नातं लव्ह मॅरेजवालं असोत किंवा अरेंज मॅरेज वालं. यामुळे हल्ली अनेक जोडप्यांची नाती सुरवातीच्या एक-दोन वर्षात तुटतात.
या पहिल्या वर्षातच अनेक लहान-मोठ्या अडचणी समोर येऊ लागतात. जर या समस्यांकडे वेळेत लक्ष दिलं नाही, तर नात्यात दुरावा येण्याची शक्यता असते. तसेच, घाई-गडबडीने निर्णय न घेता समजुतीने प्रश्न सोडवणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. यासाठी योग्य त्या अनुभवी व्यक्तींचीही मदत घ्यावी. अशा व्यक्ती केवळ आपल्या 'हो'मध्ये 'हो' मिसळणाऱ्या नसाव्यात किंवा आपले म्हणणे समजून न घेताच चूक ठरवणाऱ्याही नसाव्यात. गरज पडल्यास काऊन्सिलरचीही मदत जरूर घ्यावी. तसेच, ज्यांच्यामुळे अडचणी वाढू शकतात, अशा विनाकारण मधे-मधे करणाऱ्यांचा हस्तक्षेप टाळावा.
अशात लग्नानंतरच्या पहिल्या वर्षात नेमकं काय-काय बदलतं आणि त्यावर काय उपाय करता येतील? हे तज्ज्ञांनी सांगितलं आहे, त्याचा फायदा तुम्हाला नात्यात कसं वागायचं हे विचार करायला मिळेल.
1. संवाद कमी होणे
लग्नाच्या सुरुवातीला जोडपं एकमेकांशी सतत बोलतं. आनंद, दुःख, काम, मित्र, सगळं काही शेअर करतात. पण हळूहळू हे सगळं कमी झाल्याचं जाणवतं, जे सहाजिकच आहे. ऑफिसची व्यस्तता, घरचं ताण, थकवा आणि मग संवादाऐवजी गैरसमज त्याची जागा घेतं. मग यावर कराचं काय?
उपाय : रोज किमान फक्त 30 मिनिटं एकमेकांशी बोला. गप्पा मारा. फोन नको, टीव्ही नको, फक्त कपल. या वेळेत तुम्ही शक्य तिथे आसपास चालण्यासाठीही जाऊ शकता. एकमेकांना घरातील किंवा इतर शक्य त्या कामांमध्ये मदत करा. म्हणजे हा वेळ एकमेकांसाठी काढता येईल. स्वतःही बोला, दुसऱ्यालाही बोलू द्या.
2. रूटीनमध्ये अडकलेलं नातं
लग्नाच्या सुरुवातीला माणूस कितीही थकलेला असला, तरीही पार्टनरला वेळ द्यायला उत्सुक असतो. पण पुढे घर, नोकरी, जबाबदाऱ्या इतक्या वाढतात की, नातं फक्त "रूटीन" मध्येच अडकतं.
उपाय: कधीतरी सगळं सोडून एकत्र बाहेर जा, एकत्र जेवण करा, एकत्र जुन्या आठवणींमध्ये रमून जा.. याने नात्याला नवसंजीवनी मिळेल.
3. वैयक्तिक स्वातंत्र्याची कमतरता
सुरुवातीला प्रत्येकजण जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला उत्सुक असतो. पण हळूहळू काही लोकांना आपलं "स्वतःचं स्पेस" हवं असतं.
उपाय: नातं जवळीक देतं, पण त्यात गुदमरायला नको. दोघांनीही एकमेकांना आणि थोडा वेळ स्वतःसाठी द्यावा, तेही नात्यासाठीच उपयुक्त असतं. तसेच, स्वतःला अशी स्पेस हवी असणाऱ्या व्यक्तीने आपल्या साथीदाराच्याही स्पेसचा आदर करावा.
हेही वाचा - Chanakya Niti: पालकांनी आपल्या मुलांचं संगोपन करताना 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवाव्या..
4. आर्थिक तणाव
लग्नानंतर घरखर्च, बचत, फ्युचर प्लॅनिंग यामुळे आर्थिक ताण वाढतो. अनेकदा याच पैशांमुळे नवरा-बायकोमध्ये वाद उद्भवतात.
उपाय: लग्नाच्या सुरुवातीपासूनच दोघांनी मिळून बजेट आखा. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा. 'माझं आणि तुझं' न म्हणता 'आपलं' या विचाराने निर्णय घ्या. घरातील प्रत्येक गोष्टी आपली म्हणून विचार करा. खर्चाचं व्यवस्थापन करण्यासाठी दर महिन्याला किती रक्कम बचत करायची, ते आधी ठरवा. ती रक्कम आधीच बाजूला काढा आणि दोघांनीही काटेकोरपणे उरलेल्या रकमेत घरखर्च चालवा.
(Disclaimer : वरील बातमी सामान्य माहितीवर आधारीत आहे. जय महाराष्ट्र याची पुष्टी करत नाही.)